पेट्रोल दरवाढीवर सीतारमण यांची प्रतिक्रिया ते मुंबईसाठी चिंतेची बातमी, महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

सकाळ ऑनलाइन टीम
Sunday, 21 February 2021

अभिनेत्री करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई झाली असून तिने मुलाला जन्म दिला आहे. करीनाला मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

सरकारने इंधनाच्या किंमती कमी करुन दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याच पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि चीनमध्ये शनिवारी आणखी एक चर्चेची फेरी पार पडली. विशेष म्हणजे शनिवारी सकाळी सुरु झालेली ही बैठक रविवारी पहाटे 2 वाजता संपली. चीन आणि भारतामधील लष्करी अधिकाऱ्यांमध्ये तब्बल 16 तास चर्चा झाली. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून देशात मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आल्याचे दिसून येत आहे. वाढीव दर सर्वसामान्य नागरिकांना आवाक्याबाहेर जात आहे. त्याची सर्वसामान्यांना झळ बसते आहे. यातूनच पालकमंत्री नितीन राऊत यांच्या पुत्राच्या लग्नात चक्क पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडरची भेट देऊन केंद्र सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. यासह महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

मुंबई- अभिनेत्री करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई झाली असून तिने मुलाला जन्म दिला आहे. करीनाला मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वाचा सविस्तर

चेन्नई- Petrol-Diesel Price Rise: देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर (Petrol Price Rise) 95 रुपयांच्या पुढे गेले असून काही ठिकाणी दरांनी शंभरी गाठली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या चढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप आहे. सविस्तर वाचा

नवी दिल्ली- भारत आणि चीनमध्ये शनिवारी आणखी एक चर्चेची फेरी पार पडली. विशेष म्हणजे शनिवारी सकाळी सुरु झालेली ही बैठक रविवारी सकाळी 2 वाजता संपली. चीन आणि भारतामधील लष्करी अधिकाऱ्यांमध्ये तब्बल 16 तास चर्चा झाली. सविस्तर वाचा

मुंबई- मुंबईत पुन्हा एकदा कोरोना व्हायरसनं डोकंवर काढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत रुग्णवाढ सुरूच असून शनिवारी 897 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 3 लाख18 हजार 207 झाली आहे. सविस्तर वाचा

पुणे- नामांकीत हॉकिन्स या कुकर कंपनीच्या नावाने बनावट कुकर तयार करण्यात येत होते. या कुकरची विक्री करणाऱ्या दुकानांवर छापे टाकून 17 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सविस्तर वाचा

न्यूयॉर्क- जगभरात लसीकरण मोहीम सुरू असताना अनेक देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोने २१ मार्चपर्यंत निर्बंध वाढवले आहेत. सविस्तर वाचा

नागपूर- नातेवाइकांपैकी अत्यंत जवळच्या असलेल्यांना कोणती महागडी भेटवस्तू द्यायची याबाबत मनात विचार येत असतो. केंद्र सरकारकडून देशात मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आल्याचे दिसून येत आहे. सविस्तर वाचा

पुसेगाव (जि. सातारा)- एका कुटुंबातील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संक्रमणामुळे येथील श्री सेवागिरी विद्यालयातील सहा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे शाळा बंद करण्यात आली आहे. सविस्तर वाचा

नाशिक- मेट्रो शहरांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत असताना द्वितीय श्रेणीच्या शहरांतही भविष्यात समस्या वाढत असल्याने नियोजनाचा भाग म्हणून नाशिक शहरात विभागनिहाय इलेक्ट्रॉनिक्स कचरा (ई-वेस्ट) संकलन केंद्रे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सविस्तर वाचा

आडुळ (जि.औरंगाबाद)- बीडकडुन येणाऱ्या कारच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक ओलांडून औरंगाबादकडुन पाचोडकडे जाणाऱ्या ट्रकला समोरुन धडकली. सविस्तर वाचा

पिंपरी- ना सोशल डिस्टन्सिंगचे पालन, ना मास्कचा वापर अशा खबरदारीच्या उपाययोजनांना अनेकांनी तिलांजली दिली आहे. नागरिकांनीसुद्धा बेफिकीर वर्तन सुरू केल्यामुळे आता एकेका दिवशी अडीचशेवर नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. सविस्तर वाचा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Morning News Update petrol diesel nirmala sitharaman india china mumbai corona lockdown