esakal | तुर्कीने रचला काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट ते बिहारच्या १८ मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे ; महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

Morning News Update  Turkey Kashmir Terror Attack Bihar German bakery Pakistan Job

नोकरीच्या शोधात असलेल्या इंजिनीअर तरुण-तरुणींसाठी ही महत्त्वाची बातमी. प्रदूषण कमी करण्यासाठी शासनस्तरावरून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.तृतीयपंथीयांना मिळणार नोकरी.

तुर्कीने रचला काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट ते बिहारच्या १८ मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे ; महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जर्मन बेकरीतील स्फोटला 11 वर्ष पुर्ण तरीही तपास सुरुच. पाकिस्तानचा मित्रराष्ट्र असलेल्या तुर्कीने काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट रचला असल्याचे समोर आले आहे. बिहारच्या मंत्रिमंडाळातील २८ पैकी १८ मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे दाखल असून त्यातील १४ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल. नोकरीच्या शोधात असलेल्या इंजिनीअर तरुण-तरुणींसाठी ही महत्त्वाची बातमी. प्रदूषण कमी करण्यासाठी शासनस्तरावरून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.तृतीयपंथीयांना मिळणार नोकरी.
 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


पुणे - तब्बल अकरा वर्षे झाले तरी, कोरेगाव पार्कमधील जर्मन बेकरीतील स्फोटाचा तपास अजून सुरूच आहे. कारण, या स्फोटातील प्रमुख संशयितांनी त्यांचे बस्तान पाकिस्तानात बसविल्याची तपास यंत्रणांची माहिती आहे.....वाचा सविस्तर

अंकारा- पाकिस्तानचा मित्रराष्ट्र असलेल्या तुर्कीने काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट रचला असल्याचे समोर आले आहे. ग्रीसमधील माध्यमांत आलेल्या एका वृत्तामध्ये हा खळबळजनक दावा करण्यात आला आहे...वाचा सविस्तर 

पाटणा - बिहारच्या मंत्रिमंडाळातील २८ पैकी १८ मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे दाखल असून त्यातील १४ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची नोंद ‘नॅशनल वॉच इलेक्शन’ आणि ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म’ (एडीआर) या संस्‍थांच्या अहवालात केली आहे...वाचा सविस्तर

पुणे : नोकरीच्या शोधात असलेल्या इंजिनीअर तरुण-तरुणींसाठी ही महत्त्वाची बातमी. हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी पदाची भरती करण्यात येणार आहे...वाचा सविस्तर

औरंगाबाद : प्रदूषण कमी करण्यासाठी शासनस्तरावरून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे महापालिकेने शहरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे...वाचा सविस्तर

औरंगाबाद : तृतीयपंथीयांची समाजाकडून नेहमीच अवहेलना केली जाते. मात्र त्‍यांना समाज प्रवाहात आणण्यासाठी स्मार्ट सिटीतर्फे सुरू असलेल्या विविध उपक्रमात कंत्राटी पद्धतीने नोकरीवर सामावून घेण्याचा क्रांतिकारी निर्णय महापालिकेचे प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला आहे...वाचा सविस्तर

चेन्नई : चेन्नईच्या मैदानात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याती भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय मैदानात पहिला आणि आपला दुसरा सामना खेळणाऱ्या ओली स्टोननं शुभमन गिलच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का दिला आहे....वाचा सविस्तर


पुणे :  चाटचे अनेक प्रकार आहेत. तर काही  ठिकाणी चाट बनवण्याचे वेगवेगळे प्रकार आहे. कुणाला आंबट-गोड (खट्टी-मीठी) चाट आवडते तर कुणाला एकदम तिखट चाट खायला आवडते. तुम्हाला जर बाहेरच्यासारखी घरच्या घरी ख्रिस्पी आलू टिक्की चाट बनवायची असेल तर एक ट्रिक जाणून घ्याच....वाचा सविस्तर

'राजा हिंदुस्तानी' हा आमिर खान आणि करिश्मा कपूर यांच्या करिअरमधील सर्वांत महत्त्वाचा चित्रपट ठरला. यामधील गाणी आणि संवाद आजही अनेक प्रेक्षकांना तोंडपाठ असतील. १९९६ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आणखी एका कारणामुळे तुफान गाजला. तो म्हणजे यामधील आमिर-करिश्माचा किसिंग सीन...वाचा सविस्तर

नवी दिल्ली  - भारतीयांना हवा, जल आणि अन्य प्रकारच्या प्रदूषणाला कायम सामोरे जावे लागते. आता भूगर्भाखालील पाण्यातही विषारी अंश आढळले आहेत. देशातील २० टक्क्यांपेक्षा जास्त जमिनीखालील पाण्यात अति तीव्र विषारी द्रव्य (अर्सेनिक) असल्याचे निरीक्षण आयआयटी खड्गपूरने केलेल्या अभ्यासात नोंदविले आहे...वाचा सविस्तर