esakal | आज दिवसभरात: मुकेश अंबानींना धक्का तर अर्णब गोस्वामींना दिलासा; महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

Night.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा

आज दिवसभरात: मुकेश अंबानींना धक्का तर अर्णब गोस्वामींना दिलासा; महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

1. 'केंद्र सरकारचा धाडसी निर्णय ! इथेनॉल निर्मिती प्रकल्पामध्ये 30 हजार कोटींची गुतवणूक'

साखर उद्योगाला ऊर्जितावस्था देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. यामध्ये इथेनॉल निर्मितीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.  या निर्णयामुळे देशासह महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सविस्तर बातमी-

2. मुकेश अंबानी यांना दुसरा धक्का; श्रीमंतीला लागले ग्रहण 

रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते पण आता त्यांना मागे टाकून जुंग शानशान हे पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. अंबानी आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती नाहीत. सविस्तर बातमी-

3. काय आहे बर्ड फ्लूची लक्षणे? रोगापासून वाचण्यासाठी काय कराल?

देशात 'बर्ड फ्लू' रोगाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि केरळमध्येही याची अनेक प्रकरणे आढळून आली आहेत. बर्ड फ्लू एवियन इन्फ्लूएंजा (H5N1) याला सामान्य भाषेत बर्ड फ्लू असं म्हटलं जातं. सविस्तर बातमी-

4. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणः अर्णब गोस्वामींना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणः याचिकेत सुधारणा करण्यासाठी अधिक अवधी मुंबई उच्च न्यायालयाने आज रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना दिली. सविस्तर बातमी-

5. जुन्या मित्राला धडा शिकवण्यासाठी चंद्रकांत पाटलांची खेळी; स्वतःच्या गावात ग्रामपंचायतसाठी भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी

राज्यात भाजप विरूध्द महाविकास आघाडीचा या-ना त्या कारणाने संषर्घ सुरु आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या  खानापूर या गावातील ग्रामपंचायत निवडणूक भाजप, कॉंग्रेस व राष्ट्रवादी विरूध्द शिवसेना अशी होत आहे. सविस्तर बातमी-

दुपारच्या बातम्या: मनसेचं पोलिसांना चॅलेंज ते काँग्रेसच्या नशिबी लाथा; सर्व घडामोडी एका क्लिकवर
6. Exclusive ! सहावी ते बारावीपर्यंतच्या मुलींसाठी 'क्रांतीज्योती' योजना

मुलींची शाळांमधील कमी होत असलेली पटसंख्या आणि बालवयातच विवाह लावून देण्याची रुढ होत असलेली प्रथा खंडीत करण्याच्या हेतूने शालेय शिक्षण विभागाने आता सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थींनींसाठी नवी 'क्रांतीज्योती' योजना तयार केली आहे. सविस्तर बातमी-

7. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना अटक करा; इराणच्या मागणीमुळे ट्रम्प अडचणीत

इराणने आंतरराष्ट्रीय संस्था इंटरपोलकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इतर 47 अधिकाऱ्यांविरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी करण्याची मागणी केली आहे. सविस्तर बातमी-

8. 'मै कुवारी हूं, तेज कटारी हूं लेकिन सिर्फ तुम्हारी हूं 'म्हणत रिचा चढ्ढा घेऊन आली 'मॅडम चीफ मिनिस्टर'चा ट्रेलर

ट्रेलरमध्ये रिचा चढ्ढाचं ते रुप पाहायला मिळतंय जे याआधी कधीच पाहिलेले नाही आणि रिचाने देखील तिच्या सिने कारकिर्दीत असा वेगळा प्रयोग कधी करुन पहिलेला नाही. सविस्तर बातमी-

9. डोवाल यांच्या बचावात्मक आक्रमणापुढे काश्मीरमधील प्रमाणशून्य युद्धात पाकिस्तानचा पराभव झालाय!

भविष्यकाळात जर कधी दक्षिण आशियाच्या इतिहासातील ठळक डावपेचांसंबंधीच्या घटनांचा वस्तुनिष्ठ इतिहास कधी लिहिला गेलाच तर वर्ष २०१९ हे वर्ष हे एक कलाटणी देणारे वर्ष म्हणूनच ओळखले जाईल. सविस्तर बातमी-

10. AusvsInd : हिटमॅन रोहितच्या कमबॅकमुळं मयांक बाकावर; सैनी करणार पदार्पण

दुखापतग्रस्त उमेश यादवच्या जागी नवदीप सैनीला संघात स्थान देण्यात आले आहे. मागील दोन सामन्याला मुकलेला रोहित शर्मा संघात आल्यामुळे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघाची ताकद आणखी वाढली आहे. सविस्तर बातमी-

loading image