दुपारच्या बातम्या: मनसेचं पोलिसांना चॅलेंज ते काँग्रेसच्या नशिबी लाथा; सर्व घडामोडी एका क्लिकवर

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 6 January 2021

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा

1. PM मोदींच्या मतदारसंघातच 'ड्राय रन'ची पोलखोल; लसीकरणाच्या पूर्वतयारीचा फज्जा

राज्यातील ड्राय रन यशस्वी होत असल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाकडून केला जात आहे. असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघातच ड्राय रनचा फज्जा उडाला आहे. सविस्तर बातमी-

2. चारचाकी वाहनधारकांनो खबरदार ! तुमच्या वाहनाला आहे का फास्ट टॅग? नाही तर भरा एवढा दंड 

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने प्रवासी वाहतूक करणारी चारचाकी वाहने (एम) आणि मालवाहतूक करणारी चारचाकी वाहने (एन) या संवर्गाच्या वाहनांसाठी फास्ट टॅग अनिवार्य केले आहे. सविस्तर बातमी-

3. साताऱ्याच्या बहादराची उद्योगात मुकेश अंबानींशी स्पर्धा; ‘दुकान’अ‍ॅप पुढे जिओ मार्ट हतबल

स्थानिक दुकानदारांना डिजीटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी उद्योगपती मुकेश अंबानी यांनी जिओ मार्ट अ‍ॅपची स्थापना केली. परंतु, हे अ‍ॅप दुकानदारांना रुचले नाही. त्यामुळेच त्याचा अंबानींच्या अन्य उत्पादनाप्रमाणे फारसा गवगवा झाला नाही. अंबानींच्या अ‍ॅपला मात्र साता-यातील एका बहादराने टक्कर दिली आहे. सविस्तर बातमी-

4. मुंबईमधून होणार चीनवर मोठा ट्रेड सर्जिकल स्ट्राईक; आयात १ लाख कोटींनी कमी करण्याचा निर्णय

अखिल भारतीय व्यापारी महासंघाची (कॅट) नुक्तीच मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडली. मुंबई महानगर प्रदेशाच्या नवीन वर्षाचा बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत चीनमधून येणाऱ्या वस्तूंच्या आयातीवर निर्बंध घालण्यासंदर्भात महत्त्वाची चर्चा झाली. सविस्तर बातमी-

5. 'काँग्रेसच्या नशिबी सकाळ, दुपार, संध्याकाळ लाथाच'

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत आशिष शेलारांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. कोकणात शिवसेनेचं वस्रहरण करणार असा निर्धार भाजपनं केला आहे. तसंच पैशाचा खेळ करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे, असंही शेलार म्हणालेत. सविस्तर बातमी-

6. पाय, बरगडी तोडली, फुप्फुसावरही घाव; सामुहिक बलात्कारानंतरच्या मृत्यूने UP पुन्हा हादरलं

माणुसकीला काळीमा फासेल अशी घटना पुन्हा एकदा घडली आहे. हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेश सामुहिक बलात्काराच्या एका नृशंस अशा घटनेने हादरला आहे. दिल्लीतील 'निर्भया' प्रकरणाची आठवण करुन देणारी ही घटना घडलीय उत्तर प्रदेश मधील बदायू जिल्ह्यामध्ये. सविस्तर बातमी-

7. मनसेचं पोलिसांना ओपन चॅलेन्ज, 'वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा'

सोमवारी वसईत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात मनसेच्या दोन कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राडा घातला. यावेळी पोलिसांनी या दोन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन मारहाण केली. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदिप देशपांडे संताप व्यक्त केला आहे. सविस्तर बातमी-

8. Agree Or Not Now; तुम्हालाही Whatsapp नोटिफिकेशन आलंय का?

व्हॉटसअ‍ॅपकडून सध्या सर्व युजर्सना एक नोटिफिकेशन पाठवलं जात आहे. त्यामध्ये काही अटी असून त्या स्वीकारल्या नाहीत तर 8 फेब्रुवारी 2021 पासून तुम्ही त्याचा वापर करू शकणार नाही असं म्हटलं आहे. सविस्तर बातमी-

9. AusvsInd : हिटमॅन रोहितच्या कमबॅकमुळं मयांक बाकावर; सैनी करणार पदार्पण

दुखापतग्रस्त उमेश यादवच्या जागी नवदीप सैनीला संघात स्थान देण्यात आले आहे. मागील दोन सामन्याला मुकलेला रोहित शर्मा संघात आल्यामुळे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघाची ताकद आणखी वाढली आहे. सविस्तर बातमी-

10. सेक्रेड गेम्सचा तिसरा सिझन येणार? ; गणेश गायतोंडेनं केला खुलासा

भारतीय वेबमालिकेच्या दुनियेत ज्या काही लोकप्रिय मालिका आहेत त्यात सेक्रेड गेम्सचा नंबर अव्वल आहे. या मालिकेनं लोकप्रियतेचे अनेक विक्रम केले. ज्यावेळी ही मालिका प्रदर्शित झाली होती तेव्हा लाखोच्या संख्येनं त्याचे प्रेक्षक होते. देशातील आतापर्यतची सर्वाधिक हिट मालिका म्हणूनही सेक्रेड गेम्सचा उल्लेख करावा लागेल. सविस्तर बातमी-

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Afternoon news mns congress dry run fast tag whatsapp sports