तीन गर्लफ्रेंडसोबत लग्न करणाऱ्या स्टीवोची कहानी जगावेगळी, वाचा काय आहे प्रकरण

विशेष म्हणजे या तिन्ही मुली तिळ्या बहिणी आहे
Unique love story in Marathi, Global News in Marathi
Unique love story in Marathi, Global News in Marathi sakal

केन्या या देशात राहणारा एक व्यक्ती तीन मुलींशी लग्न करणार आहे. विशेष म्हणजे या तिन्ही मुली तिळ्या असून या तिघींसोबत रिलेशनशिप चालवणे ही फार मोठी गोष्ट नाही, असा हा व्यक्ती म्हणतोय. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्यक्तीचे नाव स्टीवो असून हा लग्नाआधीच तिन्ही गर्लफ्रेंडसोबत राहत आहे. (Unique love story in Marathi)

केट, इव्ह आणि मेरी नावाच्या या तीन बहिणींनी एका मुलाखतीत खुलासा केला की त्या स्टीवोसोबत लग्न करणार आहेत. स्टीवोला स्वत:ला तिघींचा पती म्हणून पाहायचे आहे. या तिन्ही बहिणी त्याला पाठिंबा देण्यास तयार आहेत. (person is going to get married with his three girlfriends are triplet sister)

Unique love story in Marathi, Global News in Marathi
एलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यावर पराग अग्रवाल चिंतेत; म्हणाले...

सर्वात आधी स्टीवो आणि केटची पहिली भेट झाली. यानंतर केटने तिच्या दोन बहिणींची (इव्ह आणि मेरी) स्टीव्होशी ओळख करून दिली आणि त्यानंतर चौघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही वर्षांपासून ते एकाच छताखाली आनंदाने राहत आहेत.

Unique love story in Marathi, Global News in Marathi
twttr ते Twitter; जाणून घ्या कसा होता प्रवास?

स्टीव्हो म्हणतो माझे प्रेम मुलीवर नाही तर मला तिघींचा पती म्हणून मिरवायचे आहे. हे त्यांनाही माहीत आहे. मी नेहमी त्याच्याशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ आहे. मला कोणाचीही फसवणूक करायची नाही, मला फक्त त्या तिघींसोबत लग्न करायचे आहे आणि योगायोगाने मला ही संधी मिळाली आहे. सध्या आम्ही एकमेकांकडून शिकत आहोत आणि नाते घट्ट करण्याचा प्रयत्न करतोय.

स्टीवो म्हणतो, आम्ही एक टाइम टेबल फॉलो करतो. ज्यामध्ये ठराविक तारखेला स्टीवोसोबत कोण, कधी असेल हे ठरवले जाते. तो म्हणतो की तो या नात्यात आणखी इतर कोणालाही आणणार नाही कारण त्यांचे कुटुंब सुखी आहे.

Unique love story in Marathi, Global News in Marathi
रशियाचा पराभव होतोय; अँटनी ब्लिंकन

स्टीवोने सांगितले दर सोमवारी मेरीसोबत, मंगळवारी केट आणि बुधवारी इव्ह सोबत राहतो. वीकेंडला सगळे एकत्र जमतात आणि चांगला वेळ घालवतात.

विशेष म्हणजे, मार्च 2014 मध्ये, केन्याच्या संसदेने पुरुषांना अनेक स्त्रियांशी लग्न करण्याची परवानगी देणारे विधेयक मंजूर केले. ही प्रथा मुस्लिम समुदायांमध्येही सामान्य मानली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com