काँग्रेसमध्ये घमासान; वाचा दिवसभरातील देश-विदेशच्या महत्वाच्या ७ बातम्या

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 24 August 2020

दिवसभरातील महत्वाच्या बातम्या येथे वाचा

आजचा दिवस काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमुळे गाजला. काँग्रेसमध्ये पक्ष नेतृत्वात बदल करण्याची मागणी होत आहे. पक्षाला सक्रिय आणि पूर्णवेळ अध्यक्ष असावा, अशी काँग्रेस नेत्यांची मागणी आहे. दुसरीकडे राहुल गांधी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते नाराज झाल्याचं पाहायला मिळालं.

सोनिया गांधीच तुर्तास काँग्रेसच्या अध्यक्षपदी; जाणून घ्या १० मुद्दे

काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेतृत्व बदलाची मागणी केल्याने मोठे घमासान सुरु झाले आहे. काँग्रेस नेत्यांनी सक्रीय आणि पूर्णवेळ काम करणारा अध्यक्ष निवडण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे सोनिया गांधी यांनी पद सोडण्याची तयारी दाखवली आहे. तसेच अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार निवडण्यासही सांगितलं आहे. नवा अध्यक्ष निवडला जाईपर्यंत सोनिया गांधीच हंगामी अध्यक्ष राहणार असल्याचं कळत आहेत. सविस्तर बातमी-

बिनशर्त माफी मागण्यास प्रशांत भूषण यांचा नकार; 'मी माफी मागितली तर...

ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागण्यास नकार दिला आहे. माझी वक्तव्ये ही सद्भावनापूर्ण होती आणि जर मी माफी मागितली, तर माझ्या स्वाभिमान आणि ज्या व्यवस्थेवर सर्वाधिक विश्वास आहे, त्या व्यवस्थेचा अपमान होईल, असे भूषण यांनी म्हटले आहे. सविस्तर बातमी-

आमदार चॅम्पियन पुन्हा भाजपमध्ये; सहा वर्षांची हद्दपारी एका वर्षात संपली

भाजपने सोमवारी हरिद्वार जिल्ह्यातील खानपूरचे आमदार कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन यांची हद्दपारी रद्द करत त्यांना पुन्हा पक्षामध्ये घेतले आहे. उत्तराखंड भाजप प्रदेशाध्यक्ष बंशीधर भगत यांनी याची घोषणा केली आहे. चॅम्पियन यांचे स्वागत करताना ते म्हणाले आहेत की, आपल्या वागणुकीबद्दल माफी मांगितल्यानंतर त्यांची हद्दपारी रद्द करण्यात आली आहे. चॅम्पियन यांना पक्षातून काढून १३ महिने झाले आहेत. या काळात त्यांचे आचरण खूप चांगले राहिले आहे. सविस्तर बातमी-

चीन विरुद्ध सर्व पर्याय खुले: जनरल बिपीन रावत यांचा इशारा 

भारत-चीन सीमाप्रश्न एका वेगळ्या वळणार आहे. चीनच्या आडमुठ्या भूमिकेमुळं दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलेला आहे. चीनकडून सातत्यानं होत असलेल्या कुरघोड्यांवर चर्चेतून मार्ग निघाला नाही तर, वेळप्रसंगी सैनिकी कारवाईचा पर्याय स्वीकारू, असा इशारा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी दिलाय. सविस्तर बातमी-

कोविड-१९ लशीला मोनोक्लोनल अँटिबॉडी ठरु शकतात पूरक!

औषध कंपन्या, सरकारे आणि शैक्षणिक संस्थांना मोनोक्लोनल अँटिबॉडीजचा वापर करण्याचा आग्रह जगभरातील वैज्ञानिक करत आहेत. जीवघेण्या आजारातून लढण्यासाठी कमी ते मध्यम उत्पन्न गटातील देशांनी या मोनोक्लोनल अँटिबॉडीजचा वापर करावा असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. सविस्तर बातमी-

पाॅर्न स्टारला पैसे देण्याचे ट्रम्पना आदेश

२००६ मध्ये असलेल्या लैंगिक संबंधांबाबत गुप्तता पाळण्याबाबत ट्रम्प यांनी २०१६ च्या अध्यक्षीय निवडणूकीपूर्वी डॅनिएल्सबरोबर करार करत तिला एक लाख तीस हजार डॉलर दिले होते, असा आरोप अमेरिकेतील एका वृत्तपत्राने २०१८ मध्ये केल्याने हे प्रकरण उजेडात आले होते. सविस्तर बातमी-

रशियाने दुसरी लसही बनविली; पहिल्या लशीमधील दुष्परिणाम दूर केल्याचा दावा

शियाने कोरोनावरील दुसऱ्या लशीची निर्मिती करीत असून प्रयोगशाळेतील चाचण्या पुढील महिन्यात पूर्णत्वास येण्याची अपेक्षा आहे. पहिल्या लशीतील दुष्परिणाम यात होत नसल्याचा दावा करण्यात आला. सविस्तर बातमी-


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress soniya gandhi rahul gandhi corona vaccine bipin ravat russia 24 august