काय घडलं आज देश-विदेशात? वाचा महत्वाच्या 7 बातम्या

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 16 August 2020

दिवसभरात देश-विदेशात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत

देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 12 दिवसांपासून भारतात अमेरिका आणि ब्राझिलपेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. पश्चिम बंगालमध्ये झेंडावंदन करण्यावरून निर्माण झालेल्या वादार भाजत नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. दुसरीकडे, जर आम्ही निवडणुका जिंकलो तर आमचे सरकार भारताला भेडसावणाऱ्या सर्व  धोक्यांचा सामना करण्यासाठी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिल, असं राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जो बाडडेन म्हणाले आहेत

coronavirus updates: देशात सलग 8 दिवस आढळले 60 हजारांपेक्षा अधिक रुग्ण!

गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे नवीन  63,986 रुग्ण सापडल्याने रुग्णांचा आकडा 25,89,208 पर्यंत पोहचला आहे. भारत जगातील  सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. शनिवारी एका दिवसात देशात  कोरोनाच्या 950 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे भारतातील एकूण कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा 50 हजारांच्या वर गेला आहे. सविस्तर बातमी-

झेंडावंदन करण्यावरून वाद; भाजप कार्यकर्त्याची हत्या

पश्चिम बंगालमधील नातिबपुरमध्ये तृणमूल काँग्रेस (TMC) आणि  भाजपचे कार्यकर्ते आपल्या पक्ष कार्यालयाबाहेर स्वातंत्र्यदिनानिमीत्त तिरंगा फडकविण्यासाठी जमा झाले होते. परंतु, थोड्या वेळातच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु झाला. या वादाचे रुपांतर मोठ्या तंट्यात झाले आणि भाजपच्या सुदर्शन नावाच्या ४० वर्षीय कार्यकर्त्याची यामध्ये हत्या करण्यात आली. सविस्तर बातमी-

PM मोदींनी खास संदेशासह वाहिली अटलजींना श्रद्धांजली

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज दुसरा स्मृतीदिन. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी मेमोरियल येथे जात माजी पंतप्रधान वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. तत्पूर्वी मोदींनी ट्विटच्या माध्यमातून अटल बिहारी वाजपेयी यांच्या आठवणीला उजाळा दिला.  मोदींनी  1.48 मिनिटांचा एक व्हिडिओही शेअर केलाय.  सविस्तर बातमी-

महेंद्र सिंह धोनीचं क्रिकेटमधील योगदान प्रेरणादायी : शरद पवार

माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील धोनीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. क्रिकेटशी माझा दिर्घकाळ संबंध आला. धोनीची कर्णधारपदी निवड करत असताना तो भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार ठरेल, याची खात्री होती. धोनीचे क्रिकेटमधील योगदान हे अद्वितीय आणि प्रेरणादायी आहे, असा उल्लेखही शरद पवारांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय. सविस्तर बातमी-

वैज्ञानिकांनी सांगितला कोविड-19 लक्षणांचा क्रम; मिळू शकते मोठी मदत

अमेरिकी संशोधकांनी मानसांवरील कोविड-19 लक्षणांचा क्रम उलगडला आहे. यानुसार कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर सर्वात आधी ताप येतो, त्यानंतर सर्दी, खोकला येतो, मांसपेशी दुखायला लागतात त्यानंतर मळमळ किंवा उलटी आणि अतिसार होऊ लागतो. कोविड-19 च्या लक्षणांचा हा क्रम समजल्याने फायदा होऊ शकतो. रुग्णांना तात्काळ मदत करण्यासाठी किंवा स्वत: विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेण्यासाठी याची मदत होऊ शकते. सविस्तर बातमी-

"राष्ट्रपती झालो, तर सीमेवरील सर्व धोक्यांचा सामना करण्यासाठी भारतासोबत खंभीरपणे उभा असेन"

अमेरिकेतील (America) राष्ट्रपतीपदाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन (Joe Biden) यांनी भारताबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. जर आम्ही निवडणुका जिंकलो तर आमचे सरकार भारताला भेडसावणाऱ्या सर्व  धोक्यांचा सामाना करण्यासाठी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिल, असं ते म्हणाले आहेत. त्यांनी भारत आणि अमेरिकेतील संबंध अधिक मजबूत करण्याबाबत भाष्य केलं आहे. सविस्तर बातमी-

फेसबुक पडलं तोंडावर; भाजप नेत्यांच्या वादग्रस्त पोस्ट काढून टाकल्या

अमेरिकेतील वर्तमानपत्र वॉल स्ट्रिट जर्नलने त्यांच्या एका रिपोर्टमध्ये फेसबुक आणि भाजपची भारतात युती असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये त्यांनी भारतात भाजप नेत्यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्ट आणि त्याकडे फेसबुकने केलेलं दुर्लक्ष यांचा आलेख मांडला आहे. एकीकडे ट्विटरने कारवाई केली पण फेसबुकने मात्र काहीच हालचाल केली नसल्याचंही रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. सविस्तर बातमी-

"पंतप्रधान मोदी यांचं लॉकडाऊनचं नियोजन चुकलंच"

भारताने खूप लवकर लॉकडाऊन जाहीर केला आणि लवकरच त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अपेक्षेपेक्षा परिस्थिती फार बिघडली आहे, असं वक्तव्य अर्थतज्ज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी म्हणाले आहेत. भारतात कोरोनाबाधितांचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर बॅनर्जी यांचे वक्तव्य आलं आहे. सविस्तर बातमी-


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona bjp dhoni cricket sharad pawar joe biden kamla harris us election facebook narendra modi