esakal | दिवसभरात आज काय घडलं? वाचा देश-विदेशच्या महत्वाच्या ७ बातम्या
sakal

बोलून बातमी शोधा

esakal.jpg

दिवसभरातील देश-विदेशच्या महत्वाच्या बातम्या येथे वाचा

दिवसभरात आज काय घडलं? वाचा देश-विदेशच्या महत्वाच्या ७ बातम्या

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

भारतात कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून शनिवारी रुग्णांची संख्या 30 लाखांच्या वर पोहोचली. दुसरीकडे सीरमची कोविशील्ड लस ७३ दिवसांत बाजारात उपलब्ध होईल, असं सांगितलं जात होतं. मात्र, कंपनीने याबाबत वेगळा खुलासा केला आहे. काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. विदेशात, पाकिस्तानने दाऊद इब्राहिमच्या वक्तव्यावरुन यूटर्न घेतला आहे. 


भारतात कोरोनाबाधितांची संख्या 30 लाखांच्या वर; संसर्गाचा वेग वाढला

भारतात कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून शनिवारी रुग्णांची संख्या 30 लाखांच्या वर पोहोचली. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडवारीनुसार देशात 29 लाख 75 हजार 701 रुग्ण होते. सांयकाळपर्यंत हा आकडा 30 लाखांवर पोहोचला. शुक्रवारी सकाळी 8 ते शनिवारी सकाळी 8 या 24 तासात देशात कोरोनाचे 69 हजार 878 रुग्ण आढळले होते. एका दिवसात सापडलेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. सविस्तर बातमी-

काँग्रेस नेत्यांच्या पत्रानंतर सोनिया गांधींनी घेतला मोठा निर्णय

काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी पक्षाच्या प्रमुख पदावरुन पायउतार होणार असल्याचं कळत आहे. काँग्रेसमधील २० पेक्षा अधिक बड्या नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहित नेतृत्व बदलाची मागणी केली होती. त्यानंतर सोनिया गांधी लवकरच अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. शिवाय त्यांनी काँग्रेस नेत्यांना अध्यक्ष निवडण्यास सांगितलं आहे. सविस्तर बातमी-

मोठी बातमी : कोविडची लस ७३ दिवसांत येणार नाही; वाचा सीरम इन्स्टिट्यूटचा खुलासा

देशात कोरोना व्हायरसची लस बनविण्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आघाडीवर आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या लसीची चाचणी आणि निर्मिती करत आहे. केंद्र सरकारने या लसीच्या उत्पादनासाठी सीरम कंपनीला मंजूरी दिली आहे. काही अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार, सीरमची कोविशील्ड ७३ दिवसांत बाजारात उपलब्ध होईल, परंतु कंपनीचे म्हणणे आहे की, जेव्हा सर्व चाचण्या यशस्वी होतील, आणि त्याला नियामक मान्यता मिळेल, तेव्हाच लस बाजारात येईल. सविस्तर बातमी-

ISIS दहशतवाद्याच्या घरी सापडली स्फोटके आणि आत्मघातकी जॅकेट; मोठ्या हल्ल्याची होती योजना

उत्तर प्रदेशच्या बलरामपुरमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये एक्सप्लोजिव जॅकेट सुद्धा आहेत, याद्वारे मोठा हल्ला करण्याची आंतकवाद्याची योजना असल्याचं स्पष्ट होत आहे. दिल्लीच्या धौला कुआमधून ताब्यात घेण्यात आलेला आयएसआयएसचा (ISIS) दहशतवादी अबू युसूफ बलरामपुरचाच रहिवासी आहे. आत्मघातकी हल्ल्यासाठी जॅकेट बेल्ट तयार केल्याची कबुली दहशतवाद्याने दिली होती. पोलिस आणि एटीएस त्याच्या ठिकाणांवर छापेमारी करत आहे. सविस्तर बातमी-

दाऊद इब्राहिमवरून आता पाकिस्तानचा यूटर्न 

बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांची यादी जाहीर केल्यानंतर काही तासांतच पाकिस्ताने (Pakistan) यूटर्न घेतला आहे. यादीमध्ये कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं (Dawood Ibrahim) नाव होतं. त्यामुळं दाऊद पाकिस्तानातच असल्याचं पाकिस्ताननं अप्रत्यक्षपणे कबुल केलं होतं. परंतु, आता बंदी घालती याचा अर्थ दाऊद पाकिस्तानात आहे, असा नाही, असा अजब दावा पाकिस्तानकडून करण्यात आलाय. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं याबाबत स्पष्टीकरण दिलंय. सविस्तर बातमी-

US Election: डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहिणीने त्यांच्यावर केले गंभीर आरोप

अमेरिकेतील निवडणुका (us election) जवळ आल्या असताना डोनाल्ड ट्रम्प (donald trump) यांच्या मोठ्या बहिणीने आपल्या भावावर गंभीर आरोप केले आहेत. ट्रम्प यांची बहीण मरयाने ट्रम्प बैरी (Maryanne Trump Barry) यांनी एका गुप्त पद्धतीने रिकॉर्ड करण्यात आलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये ट्रम्प यांचा कोणताही सिद्धांत नसल्याचं म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही. ट्रम्प यांनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळादरम्यान अनेकदा खोटं बोललं असल्याचं मरयाने यांनी म्हटलं आहे. सविस्तर बातमी-

अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय पंतप्रधानांचा डंका; ट्रम्प यांच्या प्रचार व्हिडिओत मोदींचा समावेश

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचार अभियानाअंतर्गत व्हिडिओच्या स्वरुपात पहिली जाहीरात जाहीर केली आहे. यात अमेरिकेतील २० लाख भारतीय-अमेरिकी मतदारांना लुभावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या अहमदाबाद येथील ऐतिहासिक भाषणातील क्लिप दाखवण्यात आली आहे. सविस्तर बातमी-

 

loading image