esakal | पाकिस्तानची सर्वात मोठी कबुली; वाचा दिवसभरातील देश-विदेशच्या महत्वाच्या 7 बातम्या
sakal

बोलून बातमी शोधा

dawood ibrahim who.jpg

दिवसभरातील देश-विदेशच्या महत्वाच्या बातम्या येथे वाचा

पाकिस्तानची सर्वात मोठी कबुली; वाचा दिवसभरातील देश-विदेशच्या महत्वाच्या 7 बातम्या

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पाकिस्तानने सर्वात मोठी कबुली दिली आहे. कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम देशात असल्याचं पाकिस्ताननं मान्य केलं आहे. दुसरीकडे संरक्षण मंत्रालयाने राफेल करारासंबंधी कोणतीही माहिती सीएजीला देण्यास नकार दिला आहे.  दोन वर्षात कोविड-19 (COVID-19)  विषाणू जगातून नष्ट होईल, असं जागतिक आरोग्य संघटनेचे ( WHO) प्रमुख टेडरोस अधानो घेब्रेसस यांनी म्हटलं आहे.

दिल्लीत प्रेशर कुकरमध्ये स्फोटकं; ISIS च्या दहशतवाद्याला अटक

दिल्लीतील धौला कुआ रिंग रोडजवळ एका दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. विशेष पथकाने केलेल्या मोहिमेवेळी चकमकही झाली. यावेळी एकाला ताब्यात घेतलं असून त्याचा साथीदार पळून गेला. ताब्यात घेण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव अबू युसूफ असल्याचं सांगितलं जात आहे. त्याच्याकडून 2 आयईडी आणि शस्त्रे जप्त करण्यात आली. सविस्तर बातमी-

संरक्षण मंत्रालयाचा 'सीएजी'ला राफेल करारासंबंधी माहिती देण्यास नकार!

संरक्षण मंत्रालयाने राफेल करारासंबंधी कोणतीही माहिती सीएजीला देण्यास नकार दिला आहे. सीएजीच्या काही अधिकाऱ्यांनुसार, संरक्षण मंत्रालयाने सीएजीला सांगितलं की राफेल विमानांची निर्मिती करणाऱ्या फ्रान्सच्या दसॉल्ट अॅविएशन कंपनीने तीन वर्षांपर्यंत कोणतीही माहिती देण्यास मनाई केली आहे. सविस्तर बातमी-

भारतात 16 दिवसांत कोरोनाने केला कहर; रुग्ण वाढीचा वेग चिंताजनक

जगभरात कोरोनाचा Covid19 वेगाने प्रसार होत असताना, एकेकाळी भारतातील India Covid updates रुग्ण वाढीचा वेग अतिशय कमी होता. पण, अनलॉकनंतर सोशल डिस्टंसिंग Social Distancing न पाळल्याचे गंभीर दुष्परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. गेल्या 16 दिवसांत देशात जवळपास दहा लाख कोरोना रुग्णांची भर पडली आहे. रोज जवळपास 70 हजारच्या आसपास रुग्ण सापडत असल्यामुळं देशातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. सविस्तर बातमी-

पंजाबमध्ये पाच घुसखोर ठार; पाकिस्तानच्या सीमेवरून भारतात येण्याचा प्रयत्न

पंजाबमधील भारत -पाकिस्तान सीमेवरून शुक्रवारी (ता.२१) रात्री उशिरा भारताच्या हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न उधळून लावत सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी पाच घुसखोरांचा खातमा केला. त्यांची झडती घेतली असता अमली पदार्थ व शस्त्रे जप्त करण्यात आली. सविस्तर बातमी-

होय दाऊद कराचीतच; पाकिस्तानने पहिल्यांदाच दिली कबुली

दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्याच्या आरोपावरून पाकिस्तानची (Pakistan) आंतरराष्ट्रीय पातळीवर गोची झाली आहे. त्यामुळेच पाकिस्तानने आज 88 दहशतवादी संघटनांवर बंदी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, त्यात कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचं (dawood ibrahim) नाव आहे. या निमित्ताने पाकिस्तानने पहिल्यांदाच दाऊद पाकिस्तानात असल्याचं कबुल केलंय. मुंबई बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम असून, तो गेली कित्येक वर्षे पाकिस्तान कराचीमध्ये (karachi) लपून बसल्याचं भारतानं आंतरराष्ट्रीय पातळीवर सांगितलं आहे. सविस्तर बातमी-

महात्मा गांधींच्या चष्म्यासाठी लागली कोट्यवधींची बोली; वाचा रक्कम 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा चष्मा अमेरिकेतील एका जिल्हाधिकाऱ्याने २ कोटी ५५ लाख रुपयास खरेदी केला. ब्रिटनच्या ब्रिस्टॉल शहरात गांधीजींच्या चष्म्याचा ऑनलाइन लिलाव करण्यात आला. हा लिलाव इस्ट ब्रिस्टॉल ऑक्शन्स संस्थेकडून आयोजित करण्यात आला होता. १९१०-३० या काळात दक्षिण आफ्रिकेत असताना महात्मा गांधी यांनी हा चष्मा घातला होता आणि त्यानंतर एका कुटुंबास भेट म्हणून दिला. सविस्तर बातमी-

कोरोना महामारी केव्हा संपेल? जागतिक आरोग्य संघटनेने दिली माहिती

कोरोना विषाणू जगभरात थैमान घालत आहे. अशात ही महामारी केव्हा आटोक्यात येईल असे प्रश्न अनेकांना सतावू लागले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. दोन वर्षात कोविड-19 (COVID-19)  विषाणू जगातून नष्ट होण्याची आशा आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेचे ( WHO) प्रमुख टेडरोस अधानो घेब्रेसस यांनी शुक्रवारी जिनिव्हा स्थित मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. सविस्तर बातमी-