ओवैसींची मोदींवर कडवट टीका; वाचा देश-विदेशच्या महत्वाच्या 7 बातम्या

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 27 September 2020

दिवसभरातील देश-विदेशच्या महत्वाच्या बातम्या येथे वाचा

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन झाले. बिहारचे माजी डिजीपी गुप्तेश्वर पांडे हे जेडीयूमध्ये सामील झाले आहेत. एमआयएमचे खासदार असददुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारला चांगलाच टोला लगावला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस ऐडनम घेब्रेसस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.

माजी संरक्षण मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले जेष्ठ नेते जसवंत सिंह यांचे निधन झाले. गेल्या सहा वर्षांपासून जसवंत सिंह कोमामध्ये होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये जसवंत सिंह यांनी1996 ते 2004 या कालावधीत संरक्षण, परराष्ट्र आणि अर्थ मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली होती. सविस्तर बातमी-

बिहार निवडणूक : माजी DGP गुप्तेश्वर पांडे यांची राजकारणात एन्ट्री; सत्ताधारी पक्षात प्रवेश
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असणारे बिहारचे माजी डिजीपी गुप्तेश्वर पांडे हे जेडीयू म्हणजेच जनता दल युनायटेडमध्ये सामील झाले आहेत. नितीश कुमार यांच्या पक्षात प्रवेश करुन गुप्तेश्वर पांडे राजकीय कारकिर्दीला सुरुवात करत आहेत. पांडे यांनी आज अधिकृतरित्या जेडीयूत प्रवेश केला. एएनआयने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर लगेचच गुप्तेश्वर पांडे यांचा राजकारणात प्रवेश होत आहे. सविस्तर बातमी-

'आधी घरात दिवा लावा नंतर...'; संयुक्त राष्ट्रातील मोदींच्या वक्तव्यावर ओवैसींची टीका 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत काल भाषण केलं. त्या भाषणात केलेल्या वक्तव्यावरुन एमआयएमचे खासदार असददुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारला चांगलाच टोला लगावला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे देशातील परिस्थिती ही दिवसेंदिवस अधिक चिंताजनक झालेली असताना हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीचं आधी काहीतरी करा आणि मग नंतर जगासाठी दिवे लावा अशी कडवट टिका ओवैसी यांनी ट्विटरवर केली आहे. सविस्तर बातमी-

भारताकडून सीमेवर टी-९० व टी ७० रणगाडे तैनात; १४ हजार फुटांवर लष्कर सज्ज

गेल्या पाच महिन्यांपासून चीनबरोबरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर आगामी थंडीच्या काळातही सज्जतेसाठी पावले टाकण्यास भारताने सुरवात केली आहे. लष्कराने पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ (एलएसी) आर्मर्ड रेजिमेंटकडील टी-९० आणि टी -७२ रणगाडे तैनात केले आहेत. चुमार - डेमचोक भागात तब्बल १४ हजार ५०० फूट उंचीवर हे रणगाडे सज्ज ठेवण्यात आले आहेत. सविस्तर बातमी-

पाण्यात सापडला मेंदू खाणारा अमिबा; अमेरिकेच्या टेक्सासमधील पाणी पुरवठा बंद

अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील दक्षिणपूर्व भागात पाण्याच्या पुरवठा साखळीमध्ये अमिबा  (brain-eating amoeba)  सापडला आहे. त्यामुळे आठ शहरांच्या नागरिकांना अलर्ट करण्यात आले आहे. हा अमिबा मेंदू खाणारा असल्याचं सांगण्यात आलं आहे. सर्वांनी काळजी घ्यावी अन्यथा यामुळे मोठे नुकसान होऊ शकते, अशी चेतावणी टेक्सास प्रशासनाने दिली आहे. सविस्तर बातमी-

Coronavirus : भारतात कोरोना रुग्णांमध्ये वाढ पण, WHOकडून मोदींचे कौतुक

जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस ऐडनम घेब्रेसस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते की भारत आपल्या उत्पादन क्षमतेचा वापर कोविड-19 विरोधात लढण्यासाठी देशांच्या मदतीसाठी करेल. टेड्रोस म्हणाले की ''महामारीविरोधात एकजुटीनेच मात करता येईल, त्यामुळे सर्वांच्या हितासाठी देशांच्या संसाधनांचा वापर केला जायला हवा. पंतप्रधान मोदी मदतीसाठी पुढे आले आहेत, त्याबद्दल त्यांचे आभार.''  सविस्तर बातमी-

US Election: बहुमताने निवडला जात नाही अमेरिकेचा अध्यक्ष; जाणून घ्या कसा लागतो निकाल 
मेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका (US elections) काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आमनेसामने आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा राष्ट्रपतीपदी विराजमान होण्याची संधी असली तरी बायडेन यांना लोकांना पाठिंबा मिळताना दिसत आहे. अशात अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल कसा लागतो हे आपण जाणून घेऊया. सविस्तर बातमी-

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jaswant singh bihar election narendra modi gupteshwar pande who corona 27 september