चित्रपटगृहात राष्ट्रगीताचा अवमान केल्याने प्रेक्षकाला अटक

वृत्तसंस्था
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

कॅटो यांनी गोन्झालेस याला दोन वेळा उभे राहण्यास सांगितले, पण त्याने तसे करण्यास नकार दिला व त्याऐवजी पॉपकॉर्न खाल्ले.

फिलिपिन्स : चित्रपटाच्या सुरू होण्यापूर्वी लागणाऱ्या राष्ट्रगीताला उभे न राहिल्याने एका प्रेक्षकाला अटक करण्यात आल्याची घटना फिलिपिन्समधील क्लार्क, पाम्पंगा येथे घडली आहे. येथील इराकमधील फिलिपिन दुतावासाचे प्रभारी एल्मर कॅटो हे यावेळी चित्रपटगृहात उपस्थित होते. त्यांनी बाईल आइनस्टाईन गोन्झालेस या 20 वर्षीय तरूणास राष्ट्रगीतासाठी उभे राहण्यास सांगितले, मात्र त्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. 

कॅटो यांनी गोन्झालेस याला दोनवेळा उभे राहण्यास सांगितले, पण त्याने तसे करण्यास नकार दिला आणि त्याऐवजी तो पॉपकॉर्न खात होता. चित्रपटानंतर कॅटो यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने गोन्झालेस याला अटक केली. दरम्यान, त्याने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत, जीएमए ऑनलाईनच्या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. 

फिलिपिन्सच्या ध्वज आणि दूतांसंबंधीची आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा गोन्झालेस याच्यावर दाखल होऊ शकतो. तसेच, 5 ते 20 हजार फिलिपिन पेसो (25 हजार भारतीय रुपये) इतका दंड होऊ शकतो. या वर्षाच्या सुरवातीला, हाऊस बिल 5224 नियमांनुसार राष्ट्रीय चिन्हास आदर सक्तीचे व बंधनकारक करण्यात आले आहे. हा नियम येथील संसदेच्या तिन्ही वाचनांमध्ये संमत करण्यात आला आहे. मात्र, यावर कायदेतज्ज्ञांच्या मिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: Marathi news Man arrested for not standing during national anthem in movie theater