esakal | नीट-जेईई परीक्षांचा मुद्दा ते अमेरिकेतील पेटलेलं आंदोलन; दिवसभरातील महत्वाच्या 7 बातम्या
sakal

बोलून बातमी शोधा

neet jee soniya gandhi congress corona virus america us chin icmr 26 august.jpg

दिवसभरातील देश-विदेशच्या महत्वाच्या बातम्या येथे वाचा

नीट-जेईई परीक्षांचा मुद्दा ते अमेरिकेतील पेटलेलं आंदोलन; दिवसभरातील महत्वाच्या 7 बातम्या

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी यातून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. दुसरीकडे, आयसीएमआरच्या महासंचालकांनी मंगळवारी देसात कोरोना पसरण्याचं प्रमुख कारण सांगितलं आहे. नीट-जेईई परीक्षेच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा कृष्णवर्णीय आंदोलन पेटले आहे.

‘रिकव्हरी’ दर ७५ टक्‍क्‍यांवर; आरोग्य मंत्रालयाची माहिती 

 देशात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या सक्रिय रूग्णसंख्येच्या ३.४ टक्‍क्‍यांनी जास्त असून बरे होण्याचा दर (रिकव्हरी दर) ७५ टक्‍क्‍यांच्या पुढे व मृत्युदर १.५८ टक्‍क्‍यांपर्यंत घसरल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाने केला. ‘रिकव्हरी’ दरामध्ये गेल्या २५ दिवसांत १०० टक्‍क्‍यांची वाढ झाल्याचेही सांगण्यात आले. सविस्तर बातमी-

भारतात कोरोना का वाढतोय? ICMR ने सांगितलं कारण

आयसीएमआरच्या महासंचालकांनी मंगळवारी देसात कोरोना पसरण्याचं प्रमुख कारण सांगितलं आहे. यासाठी त्यांनी काही बेजबाबदार लोक मास्क घालत नाहीत तसंच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत नसल्याचं म्हटलं आहे. यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव देशात मोठ्या प्रमाणावर वाढत चालला असल्याचं बलराम भार्गव यांनी सांगितलं. आयसीएमआरने दुसरा राष्ट्रीय सीरो सर्व्हे सुरू केला असून तो सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल. सविस्तर बातमी-

नीट-जेईईच्या परीक्षेच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आक्रमक; केंद्र सरकारवर जोरदार टीका

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नीट-जेईई परीक्षेच्या मुद्द्यावरुन आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी बुधवारी व्हिडिओ परिषदेद्वारे आपल्या सहयोगी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. या बैठकीत काँग्रेस शासित राज्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी भाग घेतला होता. यावेळी सर्व नेत्यांनी कोरोना काळात केंद्र सरकारने राज्याराज्यात भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. शिवाय नीट-जेईई परीक्षा घेण्याच्या केंद्राच्या निर्णयावर जोरादार टीका केली आहे. सविस्तर बातमी-

संसदेच्या आवारातून संशयित व्यक्ती ताब्यात; सापडली कोडवर्ड असलेली चिठ्ठी

संसद भवनच्या जवळ बुधवारी एक संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. संशयित व्यक्ती जवळ एक कागद सापडला आहे. सध्या इंटेलिजेंस ब्यूरोचे (आयबी) अधिकारी त्यांची चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताला विजय चौकातून ताब्यात घेण्यात आले आहे. कामावर तैनात असणाऱ्या सीआरपीएफ जवानांनी या व्यक्तीला पडकले आहे. सविस्तर बातमी-

अमेरिकेचा मैत्रीचा दावा खोटा? भारताची पाकिस्तान, सीरियासोबत केली तुलना

भारतासोबत मैत्रीचा दावा करणाऱ्या अमेरिकेने आपल्या नागरिकांना भारतात न जाण्याचा सल्ला दिला आहे. भारतातील वाढणारे कोरोनाचे संकट, गुन्हेगारी आणि दहशतवाद असे कारण यामागे सांगितलं आहे. एवढेच नाही तर अमेरिकेने भारत प्रवासासाठी 4 रेटिंग निश्चित केली आहे. रेटिंग 4 ला सर्वात वाईट मानलं जातं. या श्रेणीमध्ये भारताशिवाय युद्धग्रस्त सीरिया, दहशतवादाचे केंद्र असलेला पाकिस्तान, इराण, इराक आणि यमन या देशांचा समावेश होतो. सविस्तर बातमी-

धक्कादायक! चीनने ट्रायल न घेताच महिनाभर आधी दिली लस 

 जगभरात कोरोना पसरवणाऱ्या चीनने एक महिना आधीच त्यांच्या लोकांना कोरोना व्हॅक्सिन दिल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने शनिवारी सांगितलं होतं की, 22 जुलैपासूनच लोकांना व्हॅक्सिनचा डोस दिला जात आहे. मात्र, आयोगाने त्यांच्या चार व्हॅक्सिनपैकी कोणतं व्हॅक्सिन लोकांना दिलं हे स्पष्ट केलं नव्हतं. सविस्तर बातमी-

अमेरिका पुन्हा पेटली; कृष्णवर्णीयावरील गोळीबारानंतर आंदोलनाला हिंसक वळण

जेकब ब्लेक या कृष्णवर्णीय व्यक्तीवर गोळीबार केल्याच्या निषेधार्थ तीन दिवसांपासून विस्कॉन्सिन राज्यातील केनोशा येथे सुरु असलेल्या आंदोलनात आज दोन जणांचा बळी गेला. आंदोलनाला हिंसक वळण लागून झालेल्या गोळीबारात या दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. हा गोळीबार कोणी केला, याबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती दिली नाही. सविस्तर बातमी-