हफीझ सईदच्या "तेहरिक-इ-आझादी'वर पाकिस्तानने लादली बंदी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 जून 2017

याआधी, गेल्या जानेवारी महिन्यात पाकिस्तानकडून सईद याला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. आपल्यावरील कारवाईच्या आलेल्या अंदाजाने सईद याने "जमात'च्या भारतविरोधी कारवायांचे नियोजन "तेहरिक इ आझादी'कडे वळविले होते, असे सूत्रांनी म्हटले आहे

नवी दिल्ली - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर 2008 मध्ये घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार हफीझ सईद याचेच नवीन "ब्रेन चाईल्ड' असलेल्या "तेहरिक-इ-आझादी जम्मु काश्‍मीर' या दहशतवादी संघटनेवर पाकिस्तानकडून बंदी घालण्यात आली आहे.

सईद म्होरक्‍या असलेल्या जमात उद दवास संलग्न असलेलीच ही संघटना आहे. या संघटनेवर बंदी घालण्यात आल्याची घोषणा पाकिस्तानच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी संस्थेच्या संकेतस्थळावर करण्यात आली आहे. जमात उद दवावर अद्याप पाकिस्तानमधील सरकारकडून केवळ "लक्ष' ठेवण्यात येत आहे. याआधी, गेल्या जानेवारी महिन्यात पाकिस्तानकडून सईद याला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. आपल्यावरील कारवाईच्या आलेल्या अंदाजाने सईद याने "जमात'च्या भारतविरोधी कारवायांचे नियोजन "तेहरिक इ आझादी'कडे वळविले होते, असे सूत्रांनी म्हटले आहे.

पाकिस्तानच्या या निर्णयामागे अमेरिकेकडून वाढविण्यात आलेला दबाव कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी "दहशतवाद व पाकिस्तान' या विषयासंदर्भात कडक धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळावर ड्रोन हल्ले करण्याचा प्रस्ताव ट्रम्प प्रशासनापुढे असल्याचे वृत्तही काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाले होते.

याचबरोबर, भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या अमेरिका दौऱ्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामधूनही दहशतवादासंदर्भात पाकिस्तानला योग्य तो संदेश दिला गेल्याचे मानले जात आहे. किंबहुना, या निवेदनामध्ये थेट नावानिशी उल्लेख करण्यात आल्याने संतापलेल्या पाकिस्तानने अमेरिका आता भारताची भाषा बोलत असल्याची प्रतिक्रिया व्यक्‍त केली होती. या पार्श्‍वभूमीवर, सईद याच्याविरोधातील फास आणखी कडक करण्याची पाकिस्तानचा निर्णय संवेदनशील मानला जात आहे. मात्र याचबरोबर, सईद याच्यासंदर्भातील आश्‍वासक भासणारे हे धोरण पाकिस्तानची खेळी असण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही.

सईद यानेच लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेची स्थापना केली होती. 2001 मध्ये अमेरिकेने या संघटनेस दहशतवादी संघटना घोषित केल्यानंतर पाकिस्तानला नाईलाजाने या संघटनेवर बंदी घालावी लागली होती. जमात हे लष्करेचेच रुपांतर असून; आता जमातवर लक्ष ठेवण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर या संघटनेचे नवे नाव "तेहरिक -इ- आझादी जम्मु काश्‍मीर' असे करण्याच्या हालचाली सुरु झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

■ 'ई सकाळ'वरील महत्वाच्या ताज्या बातम्या 
बलात्काराचा आरोप करत जमावाने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू
नाशिकमध्ये व्हॉटसऍपचे हॅकिंग; दक्षतेचे आवाहन
सामान्यांच्या जेवणात दिसू लागले वरण
वारीद्वारे केली अपंगत्वावर मात
परभणी: पत्नीची पेटवून घेऊन तर पतीची गळफास घेऊन आत्महत्या
कल्याणमध्ये पावसामुळे रस्त्यावर खड्डे; वाहतुकीची कोंडी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी फरार
'बीफ' बाळगल्याच्या आरोपाखाली जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू
नाशिकमधील सोनसाळखीची चोरी सीसीटीव्हीत कैद (Video)
यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून एकाचा मृत्यू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan bans Hafiz Saeed-backed terror outfit