गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

टीम ई-सकाळ
Wednesday, 14 August 2019

मोदी म्हणाले, 'त्यांची' यादी बनवा... राज्यातील 41 पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्कार... सोन्याची झळाळी कमी; चांदीचे तेजही उतरले... Miss You Pappa म्हणत रितेश झाला भावूक... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

मोदी म्हणाले, 'त्यांची' यादी बनवा... राज्यातील 41 पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्कार... सोन्याची झळाळी कमी; चांदीचे तेजही उतरले... Miss You Pappa म्हणत रितेश झाला भावूक... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

- मोदी म्हणाले, 'त्यांची' यादी बनवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर विविध निर्णय घेतले आहेत. त्यांच्या सरकारने कलम 370 नुकतेच हटविले.

(सविस्तर बातमी)

- राज्यातील 41 पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्कार

पिंपरीचे सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) रामचंद्र जाधव, कोल्हापूरचे पोलिस उप-अधीक्षक (डीवायएसपी) राजाराम पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) मिलिंद खेतले यांच्या नावांचा समावेश आहे.

(सविस्तर बातमी)

- शाह फैजल नजरकैदेत; दिल्ली विमानतळावरून पाठविले परत

शाह फैजल हे परदेशात जाण्यासाठी दिल्लीला आले होते. मात्र, विमानतळावर त्यांना रोखण्यात आले आणि पुन्हा काश्मीरला पाठविण्यात आले. 2009 मध्ये आयएएस परीक्षेत टॉप केल्यानंतर शाह फैजल हे सर्वांसमोर आले होते.

(सविस्तर बातमी)

- देशात अजूनही गोडसेंच्या औलादी जिवंत

जम्मू काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या कलम 370 ला रद्द करण्यावरून विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकेचा भडीमार सुरू केला आहे. एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीदेखील सरकारला लक्ष्य बनविले.

(सविस्तर बातमी)

- सोन्याची झळाळी कमी; चांदीचे तेजही उतरले

जागतिक पातळीवर भावात तेजी असूनही दिल्लीत सराफांकडून मागणी घटल्याने सोन्याची झळाळी कमी झाली. औद्योगिक क्षेत्र आणि नाण्यांची निर्मिती करणाऱ्यांकडून मागणी कमी झाल्याचा फटका चांदीला बसला.

(सविस्तर बातमी)

- शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करा - शरद पवार

शिरोळ तालुक्याला 2005 च्या महापुरापेक्षा, सध्याच्या महापूराची छळ अधिक बसली आहे. या महापुरात सोयाबीन, भुईमुग यासारखी पिके कुजलेली आहेत.

(सविस्तर बातमी)

- रडायचं‌ नाही; उभं‌ राहायचं : पूरग्रस्तांमागे नाना उभा खंबीर

पुरात वाहून गेलं ते रडण्यानं परत येणार नाही, म्हणून रडायचं नाही. आपणच एकमेकांच्या पाठीशी रहायचं. परत उभं रहायचं या शब्दांत अभिनेते नाना पाटेकर यांनी पुरग्रस्तांच्या जखमांवर फुंकर घातली.

(सविस्तर बातमी)

- गैरवर्तणूकीमुळे 'या' सदस्याची विंडीज दौऱ्यातून थेट मायदेशी हकालपट्टी

गैरवर्तनामुळे क्रिकेट व्यवस्थापकाला दौऱ्यावरून मायदेशी परत बोलाविण्याची नाचक्की भारतीय क्रिकेटवर ओढविली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ताकीद मिळाल्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यातही गैरवर्तन केलेले सुनील सुब्रह्मण्यम याच्यामुळे ही वेळ आली आहे.

(सविस्तर बातमी)

- Miss You Pappa म्हणत रितेश झाला भावूक

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नते विलासराव देशमुख यांचा आज (बुधवार) सातवा स्मृतीदिन असून, त्यानिमित्त रितेश देशमुखने ट्विट करून मिस यू पापा असे म्हटले आहे.

(सविस्तर बातमी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi important news of 14th August