गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

Good-Evening
Good-Evening

Article 370 : जम्मू-काश्मीरातील शाळा, महाविद्यालये सोमवारपासून होणार सुरु... मोदींचा 'डिस्कव्हरी' शो सर्वात वाईट, ब्रिटिश वृत्तपत्राचा रिव्ह्यू!... सगळी औपचारिकता, रवी शास्त्रीच टीम इंडियाचे कोच... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

- Article 370 : जम्मू-काश्मीरातील शाळा, महाविद्यालये सोमवारपासून होणार सुरु

जम्मू काश्मीरातील कलम 370 हटविल्यानंतर राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, मागील 2-3 दिवसांपासून काश्मीरातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली आहे.

- वंचितची ताकद वाढणार; आणखी एक मोठा पक्ष सोबत येणार

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने राज्यात आपली ताकद दाखवली होती. प्रकाश आंबेडकर आणि हैदराबादच्या ओवैसी बंधू यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने आता विधानसभा निवडणुकांसाठीही कंबर कसली आहे.

- मोदींचा 'डिस्कव्हरी' शो सर्वात वाईट, ब्रिटिश वृत्तपत्राचा रिव्ह्यू!

डिस्कव्हरी वाहिनीवरील सर्वांत लोकप्रिय शो 'Man vs Wild'चे प्रक्षेपण सोमवारी नुकतेच झाले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.

- 'ती' म्हणते महापौरांनी माझा विनयभंग केलाच नाही (व्हिडीओ)

महापौर विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा हात पिरगळला नाही. त्यांनी माझा विनयभंग केलेलाच नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रश्नच येत नाही”, अशा शब्दात सांताक्रूज आंदोलनातील ‘त्या’ महिलेने आपली भूमिका मांडली आहे.

- 'तो' भाजीवाल्याचा तिरंगा आनंद महिंद्रांच्या मनात घर करुन गेला

महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी गुरुवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेले ट्विट सध्या इंटरनेटवर चांगलेच व्हायरल झाले आहे. या ट्विटमध्ये भाज्यांपासून तिरंगा साकारण्यात आल्याचे दिसत आहे.

- कुस्तीपटू बजरंग पुनियाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर

भारताचा स्टार कुस्तीपटू बंजरंग पुनियाला क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च 'राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे.

- सगळी औपचारिकता, रवी शास्त्रीच टीम इंडियाचे कोच

भारताच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्रींचीच पुन्हा निवड करण्यात आली आहे. कपिल देव, अंशुमन गायकवाड व शांता रंगास्वामी यांची क्रिकेट सल्लागार समिती मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात आज प्रशिक्षकपदाच्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर हा निर्णय देण्यात आला.

- Batla House Review : चांगल्या कथेचा पटकथेमुळं ‘एन्काउंटर’!

‘बाटला हाउस’ची कथा देशात झालेले अनेक एनकाउंटर व त्यात इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेचा कसा हात आहे, हे सांगते. याच दरम्यान दिल्लीत साखळी बॉंबस्फोट होतात आणि स्पेशल सेलचे पोलिस अतिरेक्यांचा शोध सुरू करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com