गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

गांधी-नेहरू कुटुंब हा ब्रँड... काश्मीरमधील 5 जिल्ह्यांत मोबाईल इंटरनेट सुरु... कोबंडी आधी का अंडी? अखेर उत्तर मिळाले... सर जडेजाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

गांधी-नेहरू कुटुंब हा ब्रँड... काश्मीरमधील 5 जिल्ह्यांत मोबाईल इंटरनेट सुरु... कोबंडी आधी का अंडी? अखेर उत्तर मिळाले... सर जडेजाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

- गांधी-नेहरू कुटुंब हा ब्रँड

गांधी कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीला पक्ष चालविणे अवघड जाऊ शकते. राजकारणातही 'ब्रॅंड' असतो. सध्याची भाजपची परिस्थिती पाहता, मोदी-शहा यांच्याव्यतिरिक्त भाजप इतके यश मिळवू शकतो काय?

(सविस्तर बातमी)

- 'गार्ड ऑफ ऑनर'ने पंतप्रधान मोदींचे भूतानमध्ये स्वागत

भूतानची राजधानी थिंपूच्या पश्चिमेला असलेल्या खोऱ्यातील पारो या गावातील एका मुलाने पंतप्रधानांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

(सविस्तर बातमी)

- काश्मीरमधील 5 जिल्ह्यांत मोबाईल इंटरनेट सुरु

काश्मिरमधील निर्बंध हळूहळू उठविण्यास आजपासून (शनिवार) केंद्र सरकारने सुरवात केली असून, पाच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

(सविस्तर बातमी)

- Video : तर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणार : रविशंकर प्रसाद 

इम्रान खाननं काय वक्तव्य केलं याकडे लक्ष देण्याची गरज नाही. मात्र, जर पाकिस्तान किंवा दहशतवाद्यांकडून कुठलीही कारवाई झाली तर चोख उत्तर दिले जाईल, असा इशारा केंद्रीय कायदा आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिला.

(सविस्तर बातमी)

- उद्धव ठाकरेंच्या धाकट्या मुलाचे पालींवर संशोधन

उद्धव ठाकरेंचे धाकटे चिरंजीव तेजस यांचा रस वन्यप्राण्यांमध्ये आहे. नुकताच त्याने पालींच्या नवीन प्रजाती शोधल्या आहेत.

(सविस्तर बातमी)

- कोबंडी आधी का अंडी? अखेर उत्तर मिळाले

कोंबडी आधी जन्माला आली का अंड? हा प्रश्न नेहमीच आपल्याला बुचकळ्यात पडतो. परंतु या यक्ष प्रश्नाचे उत्तर मिळवण्यास वैज्ञानिकांना मात्र यश आले आहे.

(सविस्तर बातमी)

- सर जडेजाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची अर्जुन पुरस्कारसाठी शिफारस करण्यात आली आहे. त्याच्या सह इतर 19 क्रीडापटूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

(सविस्तर बातमी)

- अक्षय कुमारचा मिशन मंगल सोशल मिडियावर बॉयकॉट

अभिनेता अक्षय कुमार सामाजिक संदेश देणारे आणि देशभक्तीपर चित्रपट मिशन मंगल ट्विटरवर  #BoycottMissionMangal असा ट्रेंड सुरु झाला आहे.

(सविस्तर बातमी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi important news of 17th August