आज दिवसभरात... (ई सकाळ न्यूज बुलेटिन)

Sakal News MAHARASHTRA News Bulletin
Sakal News MAHARASHTRA News Bulletin
  • कोपर्डी खटला: महत्त्वाच्या बातम्या


कोपर्डी प्रकरणातील तिघा नराधमांना फाशी; पीडितेला न्याय
देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने आज (बुधवार) फाशीची शिक्षा सुनावली. शाळकरी मुलीवर बलात्कारानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून या मुलीच्या न्यायासाठी मराठा क्रांती मूक मोर्चे निघाले होते. त्यामुळे, या निकालाकडे देशाचे लक्ष होते. 

कोपर्डी खटला : न्यायालयातील 'ती' पाच मिनिटे...
नगर : साडेआकरा वाजता विशेष जिल्हा व सत्र न्यायाधिश सुवर्णा केवले कक्षात आल्या. आरोपीचे वकील आलेले नसल्याने दोनदा त्यांच्या नावे पुकारा दिला. पाच मिनिटांत पुकारा देऊनही आरोपीचे वकील आले नाहीत. न्यायाधिशांनी अकरा वाजून पस्तिस मिनिटांनी आरोपीला समोर बोलावून घेतले. वेगवेगळ्या गुन्ह्यात दोन वेळा जन्मठेप, एकदा फाशीची शिक्षा सुनावली. 

कोपर्डी निकालाने पीडितेला न्याय: फडणवीस
मुंबई - कोपर्डी प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा झाल्याने पीडितेला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

माझ्या छकुलीला न्याय मिळाला: पीडितेची आई
नगर - माझ्या मुलीचा बलात्कार करून खून करणाऱ्या दोषींना फाशीची शिक्षा झाल्याने मी सर्व महाराष्ट्राचे आभार मानते. अखेर माझ्या छकुलीला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या आईने व्यक्त केली आहे.

कोपर्डी : 13 जुलै 2016 ते 29 नोव्हेंबर 2017
नगर जिल्ह्यातील कोपर्डीत शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचार आणि खुनाचा पडसाद अवघ्या राज्यातच नव्हे, तर देशातही उमटले. मराठा समाज अफाट संख्येने रस्त्यावर आला. कोपर्डीतील आरोपींना शिक्षेसह अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाने अभूतपूर्व मुक क्रांती मोर्चे काढले. जुलै 2016 ते नोव्हेंबर 2017 या 17 महिन्यांत नेमके काय काय घडले...?

न्यायालय परिसरात एक मराठा, लाख मराठा घोषणा
नगर - देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने आज (बुधवार) फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालय परिसरात मराठा संघटनांकडून एक मराठा, लाख मराठा घोषणा देण्यात आल्या.

देशभरात गाजला '#Kopardi' ट्रेंड
देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणाचा आज निकाल लागला. जिल्हा न्यायालयाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण सोशल मिडीयानेही उचलून धरले. ट्विटरने '#Kopardi' हा ट्रेंड सुरू केला आहे. देशभरातून यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रीया येत आहेत. 

फाशीची शिक्षा लवकरात लवकर अंमलात आणा: अजित पवार
मुंबई - कोपर्डी प्रकरणी न्यायालयाने दोषींना दिलेल्या फाशीच्या निकालाचे आम्ही स्वागत करतो. दोषी पुढे उच्च न्यायालयात जाऊ शकतात, त्यावेळी राज्य सरकारने सक्षमपणे बाजू मांडून ही शिक्षा कायम राहील असा प्रयत्न करायला हवा व या नराधम आरोपींची फाशीची शिक्षा लवकरात लवकर अंमलात आणली गेली पाहिजे, अशी प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

'कोपर्डीच्या भगिनीला श्रद्धांजली'
मुंबई : अहमदनगर येथील कोपर्डीतील मराठा समाजातील मुलीवर बलात्कार करुन हत्या केल्याची अमानुष घटना घडली आणि सारा देश हादरला. महाराष्ट्रात मराठा समाजाने लाखोंचे मोर्चे काढले. सगळीकडे या अभागी मुलीला न्याय मिळावा अशीच चर्चा आणि मागणी होती. 

  • दिवसभरातील इतर महत्त्वाच्या घडामोडी -

राजकारणात जायला बायको नाही म्हणते - रघुराम राजन
नवी दिल्ली: पत्नीने नकार दिल्यामुळे आपण राजकारणात न येण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय यापुढेही मी कधी राजकारणात येणार नाही, असा गौप्यस्फोट रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केला. नवी दिल्लीत झालेल्या टाईम्स लिटफेस्ट या कार्यक्रमात राजन यांची मुलाखत झाली. 

नवी दिल्ली - आयफोनच्या नव्या व्हॉट्सऍप अपडेटमध्ये आता यूट्यूब व्हिडिओ प्ले करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठी मात्र ऍप स्टोअरमध्ये जाऊन व्हॉट्सऍपचे अपडेट डाउनलोड करावे लागणार आहे.

'मॅगी'वरून नेस्ले इंडियाला 45 लाखांचा दंड
लखनऊ : नेस्ले इंडियाचे उत्पादन असलेल्या मॅगीची लॅब टेस्ट घेण्यात आली. या टेस्टमध्ये मॅगी पुन्हा एकदा फेल झाल्याने नेस्ले इंडियाला 45 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर जिल्हा प्रशासनाने नेस्ले इंडिया आणि वितरकांना हा दंड ठोठावला आहे. कंपनीसह तीन वितरकांना 15 तर दोन विक्रेत्यांना 11 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

सरकार विरोधात कोल्हापूरात राष्ट्रवादीचा हल्लाबोल 
कोल्हापूर -  "फडणवीसांना खाली खेचा आणि मोदींना घरी बसवा,' अशी हाक देत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. "क्‍या हुआ तेरा वादा' अशी घोषणा देत सरकारला जाब विचारला. 

रजनीकांतची राजकारणात 'एंट्री' लवकरच होणार
धर्मपुरी : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. त्यावर रजनीकांत यांचे बंधू सत्यनारायण राव गायकवाड यांनी रजनीकांत यांची येत्या जानेवारी महिन्यात राजकारणात 'एंट्री' होणार असल्याचे संकेत आज (बुधवार) दिले. 

काँग्रेसने गोरगरिबांना आयुष्यभर लुटले ; पंतप्रधानांचा हल्लाबोल
गांधीनगर : काँग्रेसच्या नेत्यांनी गोरगरिबांना आयुष्यभर लुटले. त्यांनी आत्तापर्यंत जनतेची खूप लूट केली आहे, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला. तसेच काँग्रेसचा जीएसटी म्हणजे 'ग्रँड स्टुपिड थॉट' आहे. अशाप्रकारे जीएसटीची अंमलबजावणी झाली असती तर गरिबांसाठी जीवनावश्यक वस्तूंवरही 18 टक्के इतका कर आकारला गेला असता, असेही ते म्हणाले.

दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ; बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक आज (बुधवार) जाहीर करण्यात आले. दहावीची परीक्षा 1 मार्चपासून तर बारावीची परीक्षा 21 फेब्रवारी 2018 पासून घेण्यात येणार आहे.

नारायण राणेंनी मंत्रीपदाची स्वप्ने बघणे सोडावे: शिवसेना
सावंतवाडी - 'नारायण राणेंनी मंत्रीपदाची स्वप्ने बघणे सोडावे. शिवसेनेचे सर्व आमदार पक्षाशी आणी पक्षप्रमुखांशी एकनिष्ठ आहेत, त्यामुळे ते राणेंना मदत करतील हे राणेंचे स्वप्नच राहील,'  अशी टीका शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी आज (बुधवार) येथे केली

लष्कर-ए-तोयबाचा समर्थक, संघटनेलाही मी आवडतो : परवेझ मुशर्रफ
इस्लामाबाद : लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा मी सर्वात मोठा समर्थक आहे. या संघटनेलाही मी आवडतो, असे वक्तव्य पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी केले. तसेच त्यांनी जमात-उद-दवाह आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांकडून केल्या जाणाऱ्या कारवायांचे समर्थनही केले.

  • व्हिडीओ-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com