‘अंदाधुंद’ च्या प्रयोगातुन सत्ता नाट्याचा थरार

संभाजी गंडमाळे
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

महाराष्ट्राने नुकतेच सत्तानाट्य अनुभवले. याच पार्श्‍वभूमीवर ‘अंदाधुंद’ या थरारक सत्तानाट्याचा अनुभव ‘परिवर्तन’च्या टीमनं दिला.

कोल्हापूर - राज्य नाट्य स्पर्धा आता सांगतेकडे निघाली असताना स्पर्धेत एकाहून एक दमदार प्रयोग सादर होऊ लागले आहेत. परिवर्तन कला फाउंडेशनने विद्यासागर अध्यापक लिखित ‘अंदाधुंद’ या नाटकाचा प्रयोग सादर केला. दिग्दर्शक किरणसिंह चव्हाण आणि त्यांच्या टीमने हे सत्तानाट्य सफाईदारपणे सादर केले.

महाराष्ट्राने नुकतेच सत्तानाट्य अनुभवले. याच पार्श्‍वभूमीवर ‘अंदाधुंद’ या थरारक सत्तानाट्याचा अनुभव ‘परिवर्तन’च्या टीमनं दिला. निवडणुकीच्या प्रचारात आपला चेहरा कुठेच नसल्याने नाराज असलेला पक्षातला गट नेत्याचा चेहरा पुसता येत नसल्यानं त्याला बंदुकीच्या गोळ्यांनी संपविण्याचा कट आखतात. त्याची जबाबदारी पक्षातलाच एक तरूण कार्यकर्ता घेतो. ठरलेल्या कटानुसार सारे काही घडत असतानाच याच गटाचा एक कार्यकर्ता परदेशातून परततो आणि पक्षाच्या नेत्याच्या अहिंसावादी, मानवतावादी चेहऱ्याचा वापर करून परदेशातून मोठ्या प्रमाणात पक्षासाठी निधी आणू आणि नेत्याला आपल्या ताब्यात ठेवू, असा सल्ला देतो. ठरलेला कट पुन्हा उधळण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. पण, मन परिवर्तनावर आयुष्यभर ठाम असलेला पक्षाचा नेता मारेकरी म्हणून आलेल्या तरूण कार्यकर्त्याचे मन परिवर्तन करतो. पण, तरीही नाटकात एक अनपेक्षित वळण येते आणि पुन्हा तोच तरूण कार्यकर्ता नेत्यावर गोळ्या झाडतो. सत्तानाट्य पुन्हा वळण घेते. परिस्थितीनुसार माणसाच्या भूमिका बदलतात, असे सांगणाऱ्या या नाराज गटाचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचा विडाच हा तरूण उचलतो आणि मग त्यालाच मारण्याचा कट शिजतो. ‘अहिंसेसाठी हिंसा’ हा युक्तिवाद येथे मांडला गेला असला तरी बंदुकीच्या गोळ्यांनी विचार मारता येत नाहीत, असा संदेशही आपसूकच मिळून जातो. 

पात्र परिचय

महेश भूतकर (गुरुनाथराव), धनंजय पाटील (दिवाकर), समीर पंडितराव (नरहरी), युवराज ओतारी (विक्रम), विद्या डांगे (अवंतिका), रोहित पोतनीस (नचिकेत), मीना ताशीलदार (गौतमी), प्रमोद कुलकर्णी (सखाराम), राजा बांबूळकर (केदारनाथ), 
राजेश शिंदे (गायतोंडे).
 दिग्दर्शक : किरणसिंह चव्हाण
 नेपथ्य : केदार कुलकर्णी
 संगीत : केदार अथणीकर, चैतन्य कुलकर्णी
 रंगभूषा : भाग्यश्री पारखे
 छायाचित्रण : अक्षय क्षीरसागर
 प्रकाश योजना : शंतनू पाटील
 वेशभूषा : स्नेहल बुरसे
 व्हिडिओ दिग्दर्शन : उमेश बगाडे
 व्हिडिओ एडिटिंग : शेखर गुरव
 नृत्य दिग्दर्शन : विशाल पाटील

राज्य नाट्य स्पर्धेच्या बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा -

‘हत्ती इलो रे मधून वेध लोकशाहीतील झुंडशाहीचा...! 

हूज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिआ वूल्फ मधून सुंदर खेळाची अनुभूती 

नातीगोती मध्ये उलघडले मतीमंद अन् त्यांच्या पालकांचे भावविश्व 

‘तुघलक’ नाटकाचा देखणा प्रयोग 

‘विच्छा माझी पुरी करा’ तून चंदगडची पोरं हुश्शारचा संदेश 

‘लग्न शांतूच्या मेहुणीचं’ अस्सल ग्रामीण बाजातील नाटक 

‘थिंक पॉईंट’ नाटकात घेतलाय या प्रश्नांचा वेध 

एका फक्कड प्रयोगाची अनुभूती नटरंगने दिली 

राज्य नाट्य स्पर्धेत प्रथमच यांची दमदार एंट्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Andhadhund show present in state drama computation