सनी लिओनी म्हणतेय 'निशाने माझं आयुष्यच बदलून टाकलं'

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

माझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. माझे विचार करण्याचे विषय बदलले आहेत.
- सनी लिओनी

मुंबई : सनी लिओनीच्या आयुष्यात एक नवीन कोणीतरी आलं आहे. निशा असं तिचं नाव आहे. निशाच्या रुपाने आपलं एक स्वप्न सत्यात उतरलं असून, तिने आपलं पूर्ण आयुष्यच बदलून टाकलंय असं सनीने अभिमानाने सांगते. निशा म्हणजे सनी लिओनीची मुलगी! होय, या चिमुकलीने सनी लिओनीच्या घरातलं वातावरण पूर्णपणे बदलून टाकलंय.

सनी आणि तिचा पती डॅनियल यांनी नुकतेच एका मुलीला दत्तक घेतले आहे. याबद्दल सांगताना सनी म्हणते, मला या गोष्टीचा अविश्वसनीय आनंद होतोय. ती जगातील सर्वांत सुंदर छोटी मुलगी आहे. ती नेहमी खूश आणि स्मितहास्य करत असते. आमच्याबद्दल खूप प्रेम दाखवत असते. तिचे पालक होण्यासाठी तिने आमची निवड केली हे आमचं भाग्य आहे, असं सनी सांगते. 

माझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. माझे विचार करण्याचे विषय बदलले आहेत. एक मिनिटही माझा दिवस चांगला जात नसेल तर मी निशाकडे पाहते. ती मला मोठी स्माईल देते आणि सगळं जे काही गैर आहे ते अदृश्य होते. ती आमच्या आयुष्यातील प्रकाश आहे, अशा भावना सनी लिओनीने व्यक्त केल्या.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
पाकसोबत मैत्री केल्यास काश्‍मीरमध्ये शांतता नांदेल - अब्दुल्ला
महिलेच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवदान
गिरीश महाजनांचा ठेका अन्‌ पोलिस निरीक्षकाची दौलतजादा ! 
माझ्यावर आरोप करण्यात काहींना आनंद वाटतो - खडसे
गुजरात सरकारची 'ब्लू व्हेल'वर बंदी
जुहू येथील इमारतीला आग; पाच जणांचा मृत्यू
ठाणे: कळव्यात महिला पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या
जनसागर लोटला
दोन्ही देशांचे हित एकातच : नरेंद्र मोदी
गणेश विसर्जनादरम्यान राज्यात 16 जणांचा मृत्यू
ब्रॅण्डबाजा! (ढिंग टांग!)

Web Title: marathi news sunny leone says nisha changed her life

टॅग्स
फोटो गॅलरी