Nana Patekar Birthday : नाना मनिषाच्या प्रेमात इतके बुडाले की, तिच्यासाठी...

नानांचा आवाज, नानांची देहबोली, नानांची हटके स्टाईल हे सगळं त्यांच्या चाहत्यांना भारावून टाकणारं आहे
Nana Patekar Birthday
Nana Patekar BirthdayEsakal

Nana Patekar Happy Birthday - नानांचा आवाज, नानांची देहबोली, नानांची हटके स्टाईल हे सगळं त्यांच्या चाहत्यांना भारावून टाकणारं आहे. तीन दशकांहून अधिक काळ नानांनी त्यांच्या चाहत्यांना मनमुराद आनंद दिला आहे. नाना जेवढे त्यांच्या अभिनयासाठी प्रसिद्ध तेवढीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा होत राहिली. Nana Patekar Bollywood Actor Manisha Koirala actress love story

१९९६ मध्ये नाना हे अग्निसाक्षी चित्रपटाच्या दरम्यान एकत्र आले. त्यावेळी मनीषा आणि प्रसिद्ध अभिनेता विवेक मुशरान यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. त्याचवेळी नानांच्या मनीषाच्या प्रेमप्रकरणाची चर्चा रंगू लागली होती. त्याविषयी त्यावेळच्या चित्रपटविषयक मासिकांमध्ये देखील त्यांच्याबद्दल बरेच काही छापून आले होते. त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती.

वास्तविक नाना आणि मनीषा हे दोघेही रागीट स्वभावाची माणसं. त्यामुळे अनेकदा त्यांची वेगवेगळ्या कारणावरुन वादावादी झाल्याचेही दिसून आले. त्यावेळी नानांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये देखील वादळ सुरु होते. त्यामुळे त्यांना मनीषाशी लग्न करणेही शक्य नव्हते. त्यावेळी तर नानांच्या बाबत वेगवेगळ्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या.

Nana Patekar Birthday
Ved Review : रितेश-जेनेलियाचा प्रेमात पाडणारा 'वेड'! अभिनय, गाणी सगळंच 'लई भारी'

नानांचे प्रसिद्ध अभिनेत्री त्यावेळची स्टार आय़शा झुल्कासोबत प्रेमसंबंध होते. असेही बोलले जात होते. त्याचा परिणाम नाना आणि मनिषा कोईराला याच्या नात्यावर झाल्याचे चर्चा अजुनही बॉलीवूडमध्ये होत असते. मनीषानं त्यावरुन नानांना परखड शब्दांत सुनावलेही होते. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. अशीही चर्चा नानांच्या चाहत्यांमध्ये रंगत असते.

Nana Patekar Birthday
Koregoan Bhima : 'अरे बाबासाहेबांनी....' कोरेगाव भीमावर अरुण कदम यांची कडक पोस्ट

मात्र त्या घटनेनंतर नानांनी मनिषासोबतचं नातं जपण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. दोघेही आपआपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात व्यस्त झाले. फिल्मफेयरच्या एका मुलाखतीमध्ये नानांनी सांगितलं होतं की, मला मनिषाची नेहमी आठवण येते. ती संवेदनशील अभिनेत्री आहे. एका कस्तुरी मृगासारखी असणाऱ्या त्या अभिनेत्रीला वेगळ्या ओळखीची काही गरज नाही. अशा शब्दांत नानांनी कौतूक केले होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com