औरंगाबाद: जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलवर करणार निदर्शने 

सुषेन जाधव
शनिवार, 10 जून 2017

संघटना, पक्षांचा सहभाग 
भारतीय कम्यूनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्यूनिस्ट पक्ष, स्वराज इंडिया, भारिप बहूजन महासंघ, सत्यशोधक समाज, शेतकरी कामगार पक्ष, राज्य किसान सभा आदिसह 12 ते 15 पक्ष, संघटनांचा शेतकरी संपात सहभाग आहे. 

औरंगाबाद - एक जूनला सुरु झालेल्या शेतकरी संपाला राज्यभरातून उस्फूर्त मिळाल्यानंतर संपाचा आता दुसरा टप्पा 12 जून ला सुरु होत आहे. सोमवारी (ता. 12) जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी 11 वाजता निदर्शने करण्यात येणार आहेत. तसेच खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, पैठण, गंगापूर, फुलंब्री येथील तहसिलवर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती भाकपचे कॉम्रेड प्रा. राम बाहेती यांनी शनिवारी (ता. 10) पत्रकार परिषदेत दिली. 

राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून औरंगाबादेत शुक्रवारी (ता. 9) विविध डाव्या लोकशाहीवादी, परिवर्तनवादी, आंबेडकरवादीी पक्ष संघटनांची भाकप कार्यालयात सत्यशोधक समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते के. ई. हरिदास यांच्या अध्यतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

शासकीय कार्यालयावरील निदर्शनाबरोबरच मंगळवारी (ता.13) औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर सकाळी अकरा वाजता रेल रोको करण्यात येणार असून अमृतसर ते नांदेड ही सचखंड एक्‍सप्रेस रोखणार असल्याचेही कॉ. बाहेती यांनी सांगितले. 

निदर्शनादरम्यान स्वामीनाथन आयोग लागू करा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, शेतीपंपाची वीजबिले माफ करा, शेतीचे पाणीप्रश्‍न त्वरित सोडवा, शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करा, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी अनुदान द्या, नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग त्वरित रद्द करा, विकास प्रकल्प राबविताना जमिन संपादित करावयाची असेल तर 2013 च्या भुसंपादन कायद्याची अंमलबजावणी करा आदि मागण्या करण्यात येणार असल्याचेही कॉम्रेड बाहेती म्हणाले. यावेळी कॉ. डॉ. भालचंद्र कानगो, प्रा. एच. एम. देसरडा, ऍड मनोहर टाकसाळ, सुभाष लोमटे, अण्णा खंदारे यांची उपस्थिती होती. 

संघटना, पक्षांचा सहभाग 
भारतीय कम्यूनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्यूनिस्ट पक्ष, स्वराज इंडिया, भारिप बहूजन महासंघ, सत्यशोधक समाज, शेतकरी कामगार पक्ष, राज्य किसान सभा आदिसह 12 ते 15 पक्ष, संघटनांचा शेतकरी संपात सहभाग आहे. 

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
जनतेच्या परिक्षेत भाजप 'ढ' ठरली: संजय राऊत
नवी मुंबईत रिक्षा चालकांकडून बस चालक व वाहकाला मारहाण
शिवराजसिंह चौहानांचे उपोषण सुरु; शेतकऱ्यांशी चर्चेस तयार
धुळे: पावसामुळे तामसवाडीजवळ रस्ता गेला वाहून
पुणे: मोदी फेस्टच्या कार्यक्रमाला खासदार, आमदारांची दांडी
लष्कराने घुसखोरीचा कट उधळला; 5 दहशतवादी ठार
महात्मा गांधी 'चतुर बनिया' होते: अमित शहा
धुळे: कर्जमाफीच्या वाऱ्यामुळे शेतकरी सभासदांनी थकविले 134 कोटी
बाईला बाई होण्यासाठी कर भरावा लागणार?
#स्पर्धापरीक्षा -'ईएनव्हीआयएस' पर्यावरण पोर्टल​
 

Web Title: Aurangabad news agitation on farmer loan waiver