'सरकारला मराठा समाजाची ताकद दाखवू'

राजेभाऊ मोगल 
शनिवार, 24 जून 2017

शहीदांना श्रद्धांजली 
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी गुरुवारी (ता.22) केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले मराठा लाइट इन्फन्ट्रीतील नाईक संदीप सर्जेराव जाधव (रा. केळगाव ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) व श्रावण माने (कोल्हापूर) यांना येथे श्रद्धाजंली वाहण्यात आली.

औरंगाबाद - मुंबईत 9 ऑगस्ट क्रांतीदिनी नियोजित मराठा क्रांती महामोर्चाच्या पूर्वतयारीसाठी समन्वय साधता यावा, म्हणून शनिवारी (ता. 24) राज्यव्यापी मध्यवर्ती कार्यालयाचे उद्‌घाटन समाजातील ज्येष्ठ अंकुशराव कदम, मधुकरराव मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. सरकारला समाजाची ताकद दाखवू, असा इशाराही समन्वयकांनी यावेळी दिला. 

जळगाव टी-पॉईंट रोड येथे बजरंग चौक ते देवगिरी नागरी सहकारी बॅंक यादरम्यान सकाळी अकरा वाजता हा उद्‌घाटन सोहळा झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून यापूर्वीच्या मोर्चातील समन्वयकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. राज्यासह देश, विदेशात 57 हून अधिक मोठी मोर्चे निघालेले असतानाही सरकारने दखल घेतली नाही. त्यामुळे समाज पुन्हा एकदा संतापला असून महामोर्चासाठी सज्ज झाला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मुंबईत होणाऱ्या महामोर्चाचे गावपातळीवर नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यास अनेकांनी हात उंचावून प्रतिसाद दिला. यावेळी विविध पक्षातील समाज बांधव मोठ्या संख्येनी उपस्थित होते. 

शहीदांना श्रद्धांजली 
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी गुरुवारी (ता.22) केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले मराठा लाइट इन्फन्ट्रीतील नाईक संदीप सर्जेराव जाधव (रा. केळगाव ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) व श्रावण माने (कोल्हापूर) यांना येथे श्रद्धाजंली वाहण्यात आली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
पैशांवरून आईशी भांडण; दहावीतील मुलाची आत्महत्या
जयपूर पोलिसांच्या पोस्टर्समुळे बुमराहची नाराजी​
चीनमध्ये "माळीण'सदृश शोकांतिका; 100 मृत्युमुखी
काश्‍मीर:मशिदीबाहेर पोलिस अधिकाऱ्यास ठेचून मारले​
एकत्र आले ठाकरे, फडणवीस, गडकरी आणि नारायण राणे
"सुपर' श्रीकांत ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत !
भारत-विंडीज सामन्यात पावसाची बॅटींग​
‘सकाळ’सारखी रचनात्मक, सकारात्मक पावले गरजेची - कारमॉन​
#स्पर्धापरीक्षा - जागतिक बॅंकेचा हवामान बदलासंबंधीचा कृती आराखडा​

Web Title: Aurangabad news Maratha community meeting