माहूरात सहा लाखाचा गुटखा जप्त, आरोपी फरार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

सिंदखेड माहुर परिसरात जोरदार पावसात पथकाने सापळा लावला होता. शुक्रवारी (ता. नऊ) रात्री साडेदहाच्या सुमारास अंधाराचा फायदा व पावसात एक वाहन भरधाव वेगाने जात असताना पथक प्रमुख ओमकांत चिंचोलकर व त्यांच्या कर्मचारी यांनी सदर वाहन अडवुन तपासणी केली. हे करीत असताना गाडीतील इसम अंधारात गायब झाला.

नांदेड - माहुर ते सिंदखेड रोड रोडवर असलेल्या रामय्या बार जवळपास अवैध रित्या गुटखा विक्री साठी येत असल्याची माहिती पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकास लागली होती. या पथकाने सापळा लावून अखेर सहा लाखाचा गुटखा व सात लाखाची गाडी असा तेरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला. संबंधितावर सिंदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंदखेड माहुर परिसरात जोरदार पावसात पथकाने सापळा लावला होता. शुक्रवारी (ता. नऊ) रात्री साडेदहाच्या सुमारास अंधाराचा फायदा व पावसात एक वाहन भरधाव वेगाने जात असताना पथक प्रमुख ओमकांत चिंचोलकर व त्यांच्या कर्मचारी यांनी सदर वाहन अडवुन तपासणी केली. हे करीत असताना गाडीतील इसम अंधारात गायब झाला. यावेळी पथकास बोलेरो जिप नंबर एम एच -१३-०१५३ मध्ये सागर व इतर कंपनीच्या गुटखा असलेले पोते मिळून आले. ज्याची अंदाजे किंमत सहा लाखाच्या जवळपास आहे तर वाहन किंमत अंदाजीत ७ लाख असा एकुण १३ लाखाचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन सिंदखेड येथे जप्त करण्यात आला आह. आर्थिक व हप्ते खोरीत अन्न व औषधे प्रशासन गुंग असुन न्यायालयाच्या आदेशान्वये सदरचे गुन्हे याच विभागाने दाखल करावे असे निर्देश असल्याने हे खाते आता आयत्या पिठावर रांगोळी काढुन गुन्हे दाखल करण्याची पोलीस प्रशासन वाट पाहत आहे.

दरम्यान माहुर किनवट तालुक्यातील ही पथकाची ४ थी मोठी कारवाई असुन दारूबंदी व अन्न व औषध प्रशासनासह स्थानिक पोलीसांना पोलीस अधिक्षकांच्या पथकाच्या धडाकेबाज कारवायामुळे धसका घेतला असला तरीही मात्र हे अवैध्य धंद्यावर कुठलीच कारवाई करीत नसल्याचे दिसून येते.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
नंदुरबार : दोन विभिन्न गटातील वादानंतर संचारबंदी लागू
जनतेच्या परिक्षेत भाजप 'ढ' ठरली: संजय राऊत
नवी मुंबईत रिक्षा चालकांकडून बस चालक व वाहकाला मारहाण
शिवराजसिंह चौहानांचे उपोषण सुरु; शेतकऱ्यांशी चर्चेस तयार
धुळे: पावसामुळे तामसवाडीजवळ रस्ता गेला वाहून
पुणे: मोदी फेस्टच्या कार्यक्रमाला खासदार, आमदारांची दांडी
लष्कराने घुसखोरीचा कट उधळला; 5 दहशतवादी ठार
महात्मा गांधी 'चतुर बनिया' होते: अमित शहा
धुळे: कर्जमाफीच्या वाऱ्यामुळे शेतकरी सभासदांनी थकविले 134 कोटी
बाईला बाई होण्यासाठी कर भरावा लागणार?
#स्पर्धापरीक्षा -'ईएनव्हीआयएस' पर्यावरण पोर्टल​
 

Web Title: Nanded News Gutkha seized in Mahur