मुंबई विद्यापीठाच्या कारभाराला कंटाळून संचालकांची स्वेच्छानिवृत्ती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

हातेकर सर आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमच्या सारख्या अभ्यासू, विद्यार्थीप्रिय प्राध्यापकाची या व्यवस्थेला गरज आहे. सगळीकडे अंधकार असताना तुम्ही आमच्यासाठी प्रकाशाचा किरण आहात. विद्यापीठ आपलं आहे, चुकीच्या लोकांच्या हातात ते गेलंय. सर, भावना लक्षात घ्या, पुन्हा विचार करा. या पडझडीच्या काळात आम्हाला आणि विद्यापीठाला तुमची नितांत गरज आहे. 
- सागर भालेराव, उपाध्यक्ष, छात्र भारती महाराष्ट्र

मुंबई : मुंबई विद्यापीठातील गोंधळामुळे मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅण्ड पब्लिक पॉलिसी विभागाचे संचालक डॉ. नीरज हातेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचे ठरवले आहे. फेसबुकवर त्यांनी ही घोषणा केली.                        
मुंबई विद्यापीठाचा कारभार खूप त्रासदायक आहे.  आता संयमाचा अंत झाला आहे. त्यामुळे मी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठासाठी मी बाहेरून काम करेन परंतु प्रशासनाचा भाग बनून काम करणे मला कठीण आहे.

हातेकर यांनी काही दिवसांपूर्वीच परीक्षा व मूल्यमापन विभागाचे विशेष कार्य अधिकारी विनायक दळवी यांच्यावर फेसबुक पोस्टमधून जाहीर टीका केली होती. पेपर तपासणीसाठी दळवी प्राध्यापकांना त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. परंतु दुसऱ्याच दिवशी हातेकर यांनी याप्रकाराबाबत जाहीर माफी मागितली होती.

मुंबई विद्यापीठात नाट्यमय घडामोडी सुरु आहेत. पेपर तपासणीत नापास झालेल्या विद्यापीठ प्रशासनाचं डोकं बिथरलंय. प्राध्यापकांना धमकावण्याचा प्रयत्न विद्यापीठाकडून होत आहे. विद्यापीठाच्या निष्क्रियतेवर प्रा. नीरज हातेकर यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर प्रशासनाने त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे. उद्विग्न झालेल्या हातेकर सरांनी स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय.खरे तर हातेकर सरांनी नाही तर कुलगुरूंनी झालेल्या प्रकारची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे.

हातेकर सर आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमच्या सारख्या अभ्यासू, विद्यार्थीप्रिय प्राध्यापकाची या व्यवस्थेला गरज आहे. सगळीकडे अंधकार असताना तुम्ही आमच्यासाठी प्रकाशाचा किरण आहात. विद्यापीठ आपलं आहे, चुकीच्या लोकांच्या हातात ते गेलंय. सर, भावना लक्षात घ्या, पुन्हा विचार करा. या पडझडीच्या काळात आम्हाला आणि विद्यापीठाला तुमची नितांत गरज आहे. 
- सागर भालेराव, उपाध्यक्ष, छात्र भारती महाराष्ट्र

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: Mumbai news Mumbai University professor voluntary retirement