'सकाळ'च्या प्लॅस्टिक मुक्त अभियानास गोविंदा पथकांकडून प्रतिसाद

दिनेश मराठे
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

प्रथमेश म्हात्रे, दिनेश म्हात्रे, रोहित शेलार,सागर सोनावणे यांनी 'सकाळ'ची हंडी यशस्वी करण्यास मोलाचे योगदान दिले. तर अखिल उमरखाडी सार्वजनिक गोकुळ काला मंडळ यांनी उमरखाडी गोविंदा पथकाच्या चित्र रथांनी केले प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. गोकुळाष्टमी निमित्त उमरखाडी सार्वजनिक गोकुळ मंडळाने 69 व्या वर्षाचे औचित्य साधत परंपरेनुसार गोपाळकाळा तीन भव्य पौराणिक चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली.

मुंबादेवी : 'सकाळ'च्या प्लॅस्टिकमुक्त वसुंधरा अभियानास उमरखाडी येथे सर्व गोविंदा पथकांकडून भरघोस प्रतिसाद लाभला.येथील गणेश चौकात अरुणोदय शिव मंदिर समीती आयोजित हंड्याना विविध पथकांकडून पाच, सहा व सात थरांची सलामी देत तर काही हंडया फोडित गोविंदानी जल्लोष केला.

प्रथमेश म्हात्रे, दिनेश म्हात्रे, रोहित शेलार,सागर सोनावणे यांनी 'सकाळ'ची हंडी यशस्वी करण्यास मोलाचे योगदान दिले. तर अखिल उमरखाडी सार्वजनिक गोकुळ काला मंडळ यांनी उमरखाडी गोविंदा पथकाच्या चित्र रथांनी केले प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. गोकुळाष्टमी निमित्त उमरखाडी सार्वजनिक गोकुळ मंडळाने 69 व्या वर्षाचे औचित्य साधत परंपरेनुसार गोपाळकाळा तीन भव्य पौराणिक चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली. या पौराणिक चित्ररथात यमुनेच्या पुरातुन वासुदेव श्रीकृष्णला डोक्यावरील पाटीतून नेत असल्याचा देखावा, भीमाकडून बकासुर राक्षसाचा वध, महाभारतातील कुरुक्षेत्रावर युद्धस्थ स्थितीतील देखावा ज्यात भगवान श्री कृष्ण, अर्जुन, भीष्माचार्य यांची आकर्षक आणि हुबेहुब वेशभुषा केलेले स्थानिक बालकलाकार आणि त्यातही मानस राजवाडकर या शालेय विद्यार्थ्याची हाती रथाचे चाक उचलून भीष्मावर उगारताना कृष्णाची केलेली अदाकारी त्याच्या मूक अभिनयातुन झळकत होती.

यात सहभागी झालेले अन्य बाल कलाकारही लोकांना लक्ष आकर्षण करीत होते. या चित्ररथांसोबत बैंड पथक, बँजोपार्टी यांच्या वाद्याच्या जल्लोशात डोंगरी, कुंभार वाडा, खेतवाडी आणि गिरगाव, ठाकुरद्वार, मुंबादेवी अशी मिरवणूक मार्गस्थ होतांना तेथील लोकांचा आणि बालगोपालांचा उत्साह ओसंडून वहात होता. निवृत्ती फलके, चेतन पुणेकर, विद्याधर साळवी, वैभव जामसांडेकर, मुकेश गावकर यांनी या गोविंदारथ सजावटीसाठी विशेष सहकार्य केले.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: Mumbai news sakal plastic free campaign