बेळगाव: आमदार संजय पाटील व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक

मल्लिकार्जुन मुगळी
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

बेळगाव : नूतनीकरण झालेल्या येथील सांबरा विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी भाजप कार्यकर्त्यांना प्रवेश न दिल्याच्या कारणावरून बेळगाव ग्रामीणचे आमदार संजय पाटील व पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली.

यावेळी माजी आमदार अभय पाटीलही उपस्थित होते. अभय पाटील यांनीच हा वाद मिटविला. पण वादाचा फायदा घेत कार्यकर्त्यानी कार्यक्रमस्थळ गाठले. 5 सप्टेंबर रोजीही आमदार संजय पाटील व पोलिस अधिकारी जयकुमार यांच्यात जोरदार वाद झाला होता. मोटरसायकल रॅलीत सहभागी झालेल्या आमदार पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून हा वाद उद्भवला होता. आज (गुरुवार) पुन्हा आमदार व पोलिसांमध्ये वाद झाला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: belgaum news mla sanjay patila and police