पावसाच्या अंदाजामुळे सकाळच्या सत्रात मतदान करण्याचे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - येथे सोमवारी विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी सकाळच्या सत्रात बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.

कोल्हापूर - येथे सोमवारी विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी सकाळच्या सत्रात बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.

सोमवारी ( ता. 21) सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत विधानसभेसाठी मतदान होत आहे. पण कोल्हापुरात गेले काही दिवस विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होत आहे. काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस होत आहे. हवामान खात्याने उद्याही विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. तरी सकाळच्या सत्रात मतदारांनी मतदान केल्यास दुपारी पडणाऱ्या पावसाचा फटका मतदानास बसणार नाही. यासाठी मतदारंनी सकाळच्या सत्रात मतदानासाठी बाहेर पडावे, असेही श्री. देसाई यांनी सांगितले.

पावसाचा अंदाज गृहित धरुन जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असेही श्री देसाई यांनी सांगितले. 

अधिक वाचा

दिवाळीत यंदा गृहसजावटीचा नवा ट्रेंड 
शेतीत साकारले छत्रपती संभाजीराजे यांचे चित्र 
Vidhan Sabha 2019 : सिंधुदुर्ग जिल्ह्यात 144 कलम लागू 
महान भारत केसरी दादू चाैगले यांचे निधन 
सिधुदुर्गातील फोडा येथे ढगफुटी... 
वाळवा तालुक्यात चोविस तासात सर्वाधिक 32.5 मि. मी. पाऊस 
बांबूच्या आकाशकंदिलांचे विविध प्रकार कोल्हापूर बाजारात - 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur collectors appeal to vote in morning session due to rain forecast