या अध्यक्षांनी स्वतःची मालमत्ता तारण ठेवून शेतकऱ्यांचे उसाचे 3.6 कोटी दिले

किरण चव्हाण
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

शेतकऱ्यांची ही एफ.आर.पी. देण्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष साठे यांनी आपली कुटुंबातील सदस्यांची पाच कोटी 76 लाख रूपयांची मालमत्ता बँकेकडे तारण ठेवून शेतकऱ्यांना एफ.आर.पी. देण्याचा मार्ग मोकळा केला.

माढा, ता. : सहकारी कारखान्याच्या अध्यक्षाने स्वत:ची व कुटुंबातील सदस्यांची पाच कोटी 76 लाख रुपयांची मालमत्ता बँकेकडे सहतारण ठेवून शेतकऱ्यांची तीन कोटी 64 लाख 98 हजार 944 रुपयांची उसाची एफ.आर.पी. देऊन साखर कारखानदारांपुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे. 

माढा तालुक्यातील पिंपळदरा - पडसाळी येथे असलेल्या श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार अॅड. धनाजीराव साठे यांनी यांच्या कारखान्यापुढील आर्थिक अडचणींमुळे सन 2014 -15 व सन 2015 - 16 या गळीत हंगामातील एफ.आर.पी. पैकी काही रक्कम शेतकऱ्यांना दयायची राहिली होती. शेतकऱ्यांची ही एफ.आर.पी. देण्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष साठे यांनी आपली कुटुंबातील सदस्यांची पाच कोटी 76 लाख रूपयांची मालमत्ता बँकेकडे तारण ठेवून शेतकऱ्यांना एफ.आर.पी. देण्याचा मार्ग मोकळा केला.

साठे यांनी शेतकऱ्यांना दाखविलेल्या या सकारात्मक भावनेमुळे आज शेतकऱ्यांच्या खात्यात तीन कोटी 64 लाख 98 हजार 944 जमा झाले आहेत. शेतकरी व कारखानदार यातील मानवी संवेदनशीलतेचा धागा कसा असावा याचे आदर्श उदाहरण साठे यांनी घालून दिले असून स्वतः च्या मालमत्तपेक्षा शेतकऱ्याची एफ.आर.पी. महत्त्वाची असल्याचे साठे यांनी दाखवून दिले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: solapur marathi news madha chairman pays farmers bill by mortgage

टॅग्स