सोलापुरात महापालिका शाळांना 'अच्छे दिन' 

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 24 जून 2017

या मिळतात मोफत सुविधा 
प्रवेश, गणवेश, पाठ्यपुस्तके, संगणक प्रशिक्षण, ई लर्निंग प्रोजेक्‍टर, वह्या, वाहनाची सुविधा, शिष्यवृत्ती मार्गदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आवश्‍यक साहित्य. 

सोलापूर - केंद्रीय पद्धतीने नियुक्त झालेल्या शिक्षकांनी पटसंख्या वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना चांगले यश आले असून, विविध खासगी शाळांतील तब्बल 236 विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या 62 शाळांत प्रवेश घेतला आहे. 

खासगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी महापालिका शाळांसमोर निर्माण केलेले अस्तित्वाचे आव्हान... विद्यादानापेक्षा इतर कामांमध्ये व्यस्त असलेले शिक्षक...विद्यार्थ्यांची सोडाच येथील शिक्षकांचीच गुणवत्ता तोंडात बोट घालायला लावणारी....या सर्वांमुळे पालकांनी महापालिका शाळांकडे फिरवलेली पाठ...अशी स्थिती दोन-तीन वर्षांपूर्वी होती. मात्र आता त्यात मोठा सकारात्मक बदल झाला असून, खासगी शाळांप्रमाणे महापालिका शाळेतही तितक्‍याच गुणवत्तेचे शिक्षण मिळत आहे. वेगवेगळ्या संकल्पना आणि उपक्रम राबविताना त्यात सातत्य ठेवल्याने या शिक्षकांना पट वाढविण्यास मदत झाली असून, खासगी शाळांतील विद्यार्थ्यांना महापालिका शाळेत आणण्यात त्यांना यश आले आहे. 

एलकेजीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत शैक्षणिक क्षेत्रात भयंकर स्पर्धा निर्माण झाली असताना महापालिकेच्या शाळा हळूहळू नामशेष होऊ लागल्या होत्या. शैक्षणिक स्पर्धेत महापालिकेच्या शाळा ताठ मानेने उभ्या राहाव्यात, यासाठी गुणवत्ता विकासाचा ध्यास विद्यमान शिक्षकांनी घेतला आणि शाळांचे स्वरुप बदलू लागले. या शिवाय सेमी इंग्रजी, ई-लर्निंग, विद्यार्थ्यांचा भावनांक काढणे, तिसरी व सहावीसाठी प्रज्ञा शोध परीक्षा, वाचन व भाषण स्पर्धा असे विविध उपक्रम सुरु आहेत. त्याचा फायदा झाला आणि विद्यार्थी संख्या वाढू लागली आहे. 

या मिळतात मोफत सुविधा 
प्रवेश, गणवेश, पाठ्यपुस्तके, संगणक प्रशिक्षण, ई लर्निंग प्रोजेक्‍टर, वह्या, वाहनाची सुविधा, शिष्यवृत्ती मार्गदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आवश्‍यक साहित्य. 

महापालिका शाळांध्ये गुणवत्तेसह भौतिक सुविधाही वाढल्या आहेत. खासगी शाळांच्या धर्तीवर या शाळांतही अत्याधुनिक सुविधा असल्याने पालकांचा ओढा सरकारी शाळांकडे वाढला आहे. 
- सुधा साळुंके, प्रशासनाधिकारी महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ 

गतवर्षी आठ खासगी शाळेतून 27 विद्यार्थी आले होते. यंदा 30विद्यार्थी आले आहेत. ई लर्निंग व लोकसहभागामुळे गेल्या तीन वर्षांत शाळेचा प'ट 30 वरून 110 वर गेला आहे. 
- नागेश गोसावी, मुख्याध्यापक 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
बेळगाव महापालिकेत प्रथमच वाजविले 'नाडगीत'
'सरकारला मराठा समाजाची ताकद दाखवू'
पैशांवरून आईशी भांडण; दहावीतील मुलाची आत्महत्या
जयपूर पोलिसांच्या पोस्टर्समुळे बुमराहची नाराजी​
चीनमध्ये "माळीण'सदृश शोकांतिका; 100 मृत्युमुखी
काश्‍मीर:मशिदीबाहेर पोलिस अधिकाऱ्यास ठेचून मारले​
एकत्र आले ठाकरे, फडणवीस, गडकरी आणि नारायण राणे
"सुपर' श्रीकांत ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत !
भारत-विंडीज सामन्यात पावसाची बॅटींग​
‘सकाळ’सारखी रचनात्मक, सकारात्मक पावले गरजेची - कारमॉन​
#स्पर्धापरीक्षा - जागतिक बॅंकेचा हवामान बदलासंबंधीचा कृती आराखडा​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur news municipal corporation schools