esakal | Pimpri : कोरोनामुळे वैधव्य आलेल्या महिलांना महापालिकेच्या वतीने समुपदेशन
sakal

बोलून बातमी शोधा

PCMC

Pimpri : कोरोनाने वैधव्य आलेल्या महिलांना पालिकेच्या वतीने समुपदेशन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कोरोना महामारीमध्ये ज्या कुटुंबातील "आधार" हिरावून घेतला. त्यांना सावरण्यासाठी महापालिकेने " उमेद जागर" हा उपक्रम आपल्यासाठी राबविला आहे. असा उपक्रम राबवणारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. महापालिकेच्या माध्यमातून येत्या तीन महिन्यांत महिलांसाठी जॉब फेअर आणि ज्या महिलांचे सध्याचे राहते घर पतीच्या नावावर होते. हे घर महिलेच्या नावावर करण्यासाठी महापालिका पुढाकार घेणार आहे. घरनोंदणीसाठी महापालिका मेळावे घेणार आहे. यासाठी वेळ प्रसंगी पोलिसांची मदत देखील घेतली जाणार आहे, असे महापालिका उपायुक्त अजय चारठाणकर यांनी सांगितले.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये २०० नवीन रुग्ण

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या "उमेद जागर" उपक्रमाच्या चौथ्या सत्रात चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित करण्यात कार्यक्रमात 'अ' प्रभाग अध्यक्ष शर्मिला बाबर, नगरसेविका अनुराधा गोरखे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या सहयोगी प्राध्यापक आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. स्मिता पानसे, उपायुक्त अजय चारठाणकर यांनी महिलांशी संवाद साधला.

हेही वाचा: पिंपरी : राष्ट्रवादीचा बहिष्कार; भाजपचा षटकार

कोरोनामुळे पतीचे निधन झाल़्याने वैधव्य आलेल्या महिलांचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने समुपदेशन करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने उमेद जागर हा उपक्रम क्षेत्रीय स्तरावर राबविण्यात येणार असून, या कार्यक्रमाचे चौथे सत्र गुरुवारी (दि.2)चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते.

हेही वाचा: चिंचवडमध्ये उभारणार विज्ञान अविष्कार नगरी

अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर महिलांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या, नैराश्यावर मात करून आलेल्या दुःखाला सामोरे जाणे ही शक्ती नक्कीच महिला भगिनींच्या मनगटात आहे. या दुःखाला कवटाळून बसण्यात आता कोणताही अर्थ नाही त्यामुळे आपण सावरू या आणि आपल्या सारख्याच इतरही काही भगिनी दुःखात असतील. त्यांनाही सावरण्यासाठी पुढे येऊ या.यामध्ये पालिकेच्या अनेक योजना आहेत त्या योजनांचा देखील आपल्याला लाभ घेता येईल.

नगरसेविका अनुराधा गोरखे म्हणाल्या, "आधार" निघून जाणे म्हणजे नक्की काय असते.हे मी स्वतः अनुभवले आहे. मात्र दुःख वारंवार कुरळण्यात कोणताही अर्थ नाही. मुले, कुटुंब यांची जबाबदारी आता आपल्याला पेलायची आहे. हा विचार करून मनामध्ये उमेद जागृत करणे गरजेचे आहे.

हेही वाचा: आकुर्डी : लष्कर भरती पुन्हा लांबणीवर

उपायुक्त चारठाणकर पुढे म्हणाले, पहिली आणि दुसरी लाट संपल्यानंतर जशी जशी माहिती समोर आली.त्यानंतर असे लक्षात आले की परिस्थिती अतिशय भयावह आहे. डोळ्यात पाणी आणण्यासारखी आहे. त्यामुळे महापालिका आणि सर्व पदाधिकारी यांनी मिळून महिलांना बळकटी देण्याचे ठरवले आणि त्यातूनच उमेद जागर हा उपक्रम पुढे आला. या माध्यमातून रोजगार, स्वयंरोजगार देण्याची तयारी दाखवली आहे. यासाठी कंपन्यादेखील पुढे आल्या आहेत.

उपायुक्त चारठाणकर यांनी सांगितले की, उमेद जागर या माध्यमातून आपण एकत्र आलो आहोत. एकत्र येण्याचे निमित्त जरी चांगले नसले, तरी यातून सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे आहे. आपल्या घरातील जबाबदारी घेणारा व्यक्ती निघून गेली. या पेक्षा मोठे दुःख जगात कोणतेही असू शकत नाही. परिस्थितीचा घाव इतका मोठा आहे. त्यातून सावरण्याचे बळ आपण स्वतःच्या मनातून प्रथम निर्माण करायचे आहे. त्याला पाठिंबा पिंपरी-चिंचवड पालिका देत आहे. गेल्या दीड वर्षात आपण सर्वांनी खूप मोठा संघर्ष केला. मात्र आता सावरण्याची वेळ आहे. पिंपरी चिंचवड महापालिका नागरवस्ती विभागाच्या 100 पेक्षा जास्त योजना आहेत.त्यामुळे पालिकेच्या योजनांचा आपण वापर करून आपल्या आयुष्याला टर्निंग पॉइंट देणे गरजेचे आहे. महापालिका विविध योजनांमधून महिलांना अर्थसाह्य करत आहे. मात्र परिस्थितीने आम्हाला योजनांची व्याप्ती बदलायची गरज असल्याचे पटवून दिले. त्यामुळे आम्ही कामाची दिशा वेगळ्या पद्धतीने सुरु केली. त्याचीच परिणीती आपण विधवा महिलांच्या अर्थसहाय्यात 25 हजारांपर्यंत वाढ केली आहे.

हेही वाचा: INDvsENG 4th Test Day 1: तोच स्विंग, तीच पडझड!

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. स्मिता पानसे यांनी यावेळी महिलांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, मानसिक दृष्ट्या खचलेल्या महिलांना सावरण्यासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील (वायसीएम) मानसोपचार तज्ञ करणार आहेत. आपल्या स्वतःतील उमेद जागृत ठेवून मानसिकरित्या उभारी घेतली तर या संकटाचा आपण नक्कीच की सामना करू शकतो.

हेही वाचा: Corona Update : राज्यात दिवसभरात ४३४२ रुग्णांची नोंद

विधवांचे दुःख डोंगराएवढे

उमेद जागर या कार्यक्रमातून काही महिलांनी आपली परिस्थिती व्यक्त केली. त्यावेळी हे दुःख डोंगराएवढे असल्याचे दिसून आले.

अनिता( नाव बदलले आहे) म्हणाल्या : आम्ही वाकड परिसरात राहतो. माझे पती मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीला होते. उच्चपदस्थ अधिकारी म्हणून त्यांची नोकरी होती. मात्र दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोना महामारीने जखडले. त्यातून ते वाचू शकले नाहीत. आता या गोष्टीला सहा महिने होतील. मात्र सहा महिन्यानंतर परिस्थिती अतिशय वेगळी झाली आहे. आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहतो तिथला मेंटेनन्स, मुले चांगल्या शाळेत आहेत त्या शाळेची फी आता हे सगळं आवाक्याबाहेर गेलेले आहे. त्यामुळे आता मला आहे त्या परिस्थितीला स्वीकारून मुलांच्या शिक्षणासाठी, कुटुंबाला सावरण्यासाठी स्वयंरोजगार किंवा रोजगार करावा लागणार आहे. यासाठी महापालिकेचा उपक्रम 'उमेद जागर' याची माहिती मिळाली आणि मी या उपक्रमांतर्गत आत्मनिर्भर होण्यासाठी यांच्याशी जोडले गेले आहे.

सुनीता( नाव बदलले आहे) म्हणाल्या : मी चिंचवड परिसरात राहते. पहिला लाटेच्या तडाख्यात माझे पती आमच्यातून निघून गेले. मला दोन मुले आहेत.एक बारावी दुसरा दहावीचे शिक्षण घेत आहे. गेल्या वर्षभराच्या काळात एकामागून एक अशा प्रकारे संकट येत गेली. त्यातून सावरता सावरता हतबल झालेले असतानाच महावितरणने एक लाख रुपयांचे वीजबिल हातात टेकवले.वारंवार विनंती अर्ज करून देखील काही सवलत मिळालेली नाही. परिस्थिती वीज मीटर तोडण्यापर्यंत गेलेले असल्यामुळे आता काय करावे अशा चिंतेत मी आहे. मुलांनी अभ्यास तरी कसा करावा.

हेही वाचा: शार्दूलचा इंग्लंडला मराठमोळा दणका! षटकार ठोकत केलं अर्धशतक

सीमा( नाव बदलले आहे) म्हणाल्या : आम्ही भोसरी येथील चक्रपाणी वसाहत या ठिकाणी वास्तव्याला आहे. माझे पती सणसवाडी येथे नोकरीला होते. गेल्या सहा महिन्यात जो आघात आमच्यावर कोसळला. यासारखे दुर्दैव किंवा दुःख असू शकत नाही. या कोरोना महामारीने पतीसहित माझ्या दोन मुली माझ्यापासून हिरावून घेतल्या. आता एक मुलगा आणि मी मागे उरलोआहोत. दुःख खूप मोठे आहे.मात्र आता त्यातून सावरण्यासाठी पालिकेने नक्कीच बळ दिले आहे.

कविता ( नाव बदलले आहे) म्हणाल्या : मी दिघी येथे राहते माझे वय आता 53 आहे. एक मुलगी आहे तिचे लग्न झाले आहे. पती आणि मी दोघे आम्ही राहत होतो. वय, कोणाचाही आधार नाही हा विचार खरच मन पोखरून टाकत असतो. अशा वेळी उमेद जागर या कार्यक्रमातून जगण्याची इच्छा निर्माण झाली आहे.

हेही वाचा: बेकायदा ‘सॉ मिल्स’आरागिरणीवर पुणे वनविभागाची कारवाई

या कार्यक्रमांमध्ये पुणे कनेक्ट लाईट हाऊस या स्वयंसेवी संस्थेच्या रेश्मा कांबळे यांनी लाईट हाऊस उपक्रमातून राबविल्या जाणाऱ्या विविध कोर्सेसची माहिती दिली.तसेच महिलांना यातून शिकता येण्यासारख्या गोष्टींबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास बहाद्दरपुरे यांनी केले.

loading image
go to top