
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवले आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगने घेतलेला हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे गटासाठी धक्का असल्याचे म्हटले जात आहे. याच पार्श्वभुमीवर आज भारतातील पक्ष आणि त्यांचे चिन्हे यांचा आढावा घेऊयात.
भारतीय निवडणूक आयोगाने 15 मार्च 2019 रोजी जाहीर केलेल्या राजकीय पक्षांच्या यादीनुसार भारतामध्ये एकूण 2334 राजकीय पक्ष असून, त्यापैकी 8 राष्ट्रीय पक्ष, 26 राज्यस्तरीय पक्ष आणि इतर 2301 नोंदणीकृत पक्ष आहेत. यापैकी महाराष्ट्रात एकूण 145 नोंदणीकृत पक्ष आहेत. याच राजकीय पक्षांची चिन्हे पाहुयात...
● भारतीय जनता पक्ष
देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची ओळख आहे. भाजपचे निवडणूक चिन्ह कमळाचे फुल आहे. 1951 मध्ये डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी यांनी स्थापित केलेले भारतीय जनसंघ हेच सध्याचे भाजप आहे. त्या वेळी भारतीय जनसंघाचे निवडणूक चिन्ह 'दिवा' होते. 1977 मध्ये त्यांचे निवडणूक चिन्ह 'हलधर शेतकरी' होते. 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाला नवी उभारी मिळाली आणि त्यांनी आपले निवडणूक चिन्ह कमळ केले.
● भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चिन्ह हापाचा पंजा आहे. 1885 मध्ये काँग्रेसचे चिन्ह दोन बैल होते. त्यानंतर निवडणूक चिन्ह बदलून गाय-वासरू बनलं. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी पक्षाला नवीन उर्जा दिली आणि नवीन काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी त्यांनी हाताचा पंजा हे चिन्ह निश्चित केले.
● बहुजन समाज पक्ष
बहुजन समाज पक्षाचे चिन्ह हत्ती आहे. बसपाचे निवडणूक चिन्ह 'हत्ती' शारीरिक शक्ती आणि इच्छाशक्ती दोन्ही दर्शवते. हा एक विशाल प्राणी आहे आणि सहसा तो शांत राहतो. बसपा आसाम आणि सिक्कीम या दोन राज्यात निवडणूक लढवत नाही.
● मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
या पक्षाचे चिन्ह हे कोयता आणि हातोडा आहे. शेतमजूर आणि कामगार,मजूर यांच्या हक्कांसाठी लढणारा हा पक्ष आहे.
● भारतीय कम्युनिस्ट पक्ष
भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजेच सीपीआयचे निवडणूक चिन्ह विळा आणि कोयता असून 1952 मध्ये ते निवडण्यात आले आहे. या पक्षात फूट पडल्याने एक नवीन गट मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी तयार झाला.
● राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह निळ्या रंगातील घड्याळ आहे. या घड्याळाला दोन पाय आणि अलार्म बटण देखील आहे.
● समाजवादी पक्ष
समाजवादी पक्षाचे चिन्ह सायकल आहे. पक्षाच्या लाल आणि हिरव्या रंगाच्या झेंड्यावर छापलेले आहे. लाल रंग संघर्ष आणि क्रांती तर हिरवा रंग हिरवळ दर्शवितो.
● बिजू जनता दल
बिजू जनता दलासाठी निवडणूक आयोगाने मंजूर केलेले निवडणूक चिन्ह म्हणजे डावीकडे वाकलेला शंख होय. शंख हे प्राचीन भारतीय परंपरा दर्शवते.
● जनता दल
जनता दलासाठी निवडणूक आयोगाने 'बाण' चिन्हाला मान्यता दिली आहे. हा बाण हिरव्या आणि पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यावर बनवला आहे. वास्तविक हा झेंडा जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पक्षाचा होता.
● तेलुगु देशम पक्ष
या पक्षाचे निवडणूक चिन्ह 'सायकल' आहे. सहसा ही पिवळ्या बनवले जाते. पिवळा रंग संपत्ती, आनंद आणि धन संपत्तीचा रंग आहे.
● अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके)
एआयएडीएमकेचा निवडणूक चिन्ह झाडाची दोन पाने आहे. 1989 मध्ये जयललिता यांच्या एआयएडीएमके पक्षाला 'दोन पानांचे' निवडणूक चिन्ह देण्यात आले होते.
● द्रविड मुन्नेत्र कळघम
द्रमुकचे निवडणूक चिन्ह दोन पर्वतांमध्ये किरण पसरवणारा उगवणारा सूर्य सूर्य आहे. या चिन्हाचा अर्थ अशा प्रकारे अर्थपूर्ण आहे की तामिळनाडू आणि पॉंडिचेरीचे लोक याने लवकर जोडले गेले. त्याच वेळी 'राइजिंग सन' नामक एक इंग्रजी दैनिक देखील तामिळनाडूमध्ये असायचे.
● राष्ट्रवादी तृणमूल काँग्रेस
एआयटीएमसीचे निवडणूक चिन्ह 'दोन फुले' आहे. या चिन्हात राष्ट्रीय ध्वजाचे सर्व रंग आहे. पक्षाचा राजकीय नारा 'आई, माती आणि मनुष्य' आहे. तृणमूल काँग्रेसचे चिन्ह पुष्प आणि गवत मातृत्व किंवा आपल्या देशाच्या घटकाचे प्रतिनिधित्व करते.
● जनता दल
जेडीचे निवडणूक चिन्ह डोक्यावर धान्य घेतलेली एक शेतकरी महिला' आहे. पक्षाच्या चिन्हात महिला दर्शविणे म्हणजे महिला अधिकार आणि त्यांच्या संधींविषयी काळजी वाटणे दर्शवते.
● राष्ट्रीय जनता दल
राजदचे निवडणूक चिन्ह 'कंदिल' आहे. लालटेन आत्मज्ञान, साक्षरता आणि प्रगती यांचा प्रकाश आहे. या निवडणूक चिन्हाला अंधकाराचे उन्मूलन आणि प्रकाश आणि प्रेमाचा प्रचार असे म्हटले जाते.
● शिवसेना
शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आहे. सहसा हे पक्षाच्या भगव्या रंगाच्या ध्वजावर वापरला जाते. भरवा रंग हिंदू धर्माचे प्रतीक आहे.
● महाराष्ट्र नवनिर्माण सेना
मनसेचा निवडणूक चिन्ह उजवीकडे जात असलेला 'रेल्वेचा स्टीम इंजिन' आहे. तीन रंगाच्या ध्वजावर हे चिन्ह आहे. त्यावर दोन पांढरे पट्टे देखील आहे.
● आम आदमी पक्ष
नव्याने जन्माला आलेल्या आपचे निवडणूक चिन्ह 'झाडू' आहे. भ्रष्टाचार निर्मूलन करण्याच्या उद्देशाने हा पक्ष अस्तित्वात आला. झाडू घेऊन देशातील सर्व प्रकारचे भ्रष्टाचार स्वच्छ करणे आवश्यक असल्याचे या पक्षाचा उद्देश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.