पुणे: बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार

मिलिंद संधान
शनिवार, 24 जून 2017

योगेश शंकर शेलार (४०, रा. पिंपळे गुरव) हे जखमी झाले आहेत. डीसीपी गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार शेलार हे बांधकाम व्यवसायिक असून ते सकाळी त्यांच्या स्विफ्ट कारमधून निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

पुणे - नवी सांगवी परिसरात आज (शनिवार) सकाळी बांधकाम व्यावसायिक योगेश शेलार यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात ते जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, घरातून मोटारीतून निघालेल्या बांधकाम व्यवसायिकांवर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. ही घटना सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळे गुरव येथील बस थांब्याजवळील तुळजाभवानी मंदिरासमोर आज (शनिवार) सकाळी साडेअकरा वाजता घडली. 

योगेश शंकर शेलार (४०, रा. पिंपळे गुरव) हे जखमी झाले आहेत. डीसीपी गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार शेलार हे बांधकाम व्यवसायिक असून ते सकाळी त्यांच्या स्विफ्ट कारमधून निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांचा पायाला गोळ्या लागलेल्या असून त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे. हल्लेखोर आणि कारण अद्याप कळले नाही.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
पैशांवरून आईशी भांडण; दहावीतील मुलाची आत्महत्या
जयपूर पोलिसांच्या पोस्टर्समुळे बुमराहची नाराजी​
चीनमध्ये "माळीण'सदृश शोकांतिका; 100 मृत्युमुखी
काश्‍मीर:मशिदीबाहेर पोलिस अधिकाऱ्यास ठेचून मारले​
एकत्र आले ठाकरे, फडणवीस, गडकरी आणि नारायण राणे
"सुपर' श्रीकांत ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत !
भारत-विंडीज सामन्यात पावसाची बॅटींग​
‘सकाळ’सारखी रचनात्मक, सकारात्मक पावले गरजेची - कारमॉन​
#स्पर्धापरीक्षा - जागतिक बॅंकेचा हवामान बदलासंबंधीचा कृती आराखडा​
वादग्रस्त कामांवरून महाजन, सवरांमध्ये जुंपली​

Web Title: Pune news firing in sangvi

टॅग्स