पेट्रोल पंप घोटाळा; पुण्यातील चंदननगर येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंप सील

उत्तम कुटे
रविवार, 23 जुलै 2017

पुणे - पेट्रोल देण्याच्या 'मापात पाप' करण्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. या प्रकरणी देशातील अनेक पेट्रोल पंपावर छापा टाकून पोलिसांनी सदरचे पेट्रोलपंप सील केले आहेत. असाच एक प्रकार पुण्यातील चंदननगर येथील ‘इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर आढळून आला असून ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज शनिवार (दि.२२) रोजी दुपारच्या सुमारास छापा टाकत सदर पेट्रोल पंप सील केला आहे.
 

पुणे - पेट्रोल देण्याच्या 'मापात पाप' करण्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. या प्रकरणी देशातील अनेक पेट्रोल पंपावर छापा टाकून पोलिसांनी सदरचे पेट्रोलपंप सील केले आहेत. असाच एक प्रकार पुण्यातील चंदननगर येथील ‘इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर आढळून आला असून ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज शनिवार (दि.२२) रोजी दुपारच्या सुमारास छापा टाकत सदर पेट्रोल पंप सील केला आहे.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे पाठोपाठ पुण्यातही पेट्रोलच्या मापात पाप असल्याचे आढळून आले असून पुण्यातील पेट्रोल पंपांवरही मापामध्ये छेडछाड केली जात असल्याचे उघड झाले आहे. ठाण्यामध्ये करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान अटकेतील आरोपींच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. तसेच पुण्यातील ही पहिलीच कारवाई असून आणखी पेट्रोल पंपांबाबतही आपणाकडे माहिती असून तेथेही कारवाई होऊ शकते, असे पोलीस अधिकारी कल्याणराव करपे यांनी सांगितले आहे.  
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे शहरात इलेक्ट्रॉनिक चीपद्वारे पेट्रोलच्या मापात पाप करणारा सूत्रधार प्रशांत नूलकर याला १२ जुलैला बेड्या ठोकण्यात आल्या. ठाणे क्राईम ब्रांचने ही कारवाई केली असून प्रशांत नूलकरला कर्नाटकमधील हुबळीमधून ताब्यात घेतले होते. यावेळी इंधन भरण्याच्या यंत्रामध्ये छेडछाड करुन घोटाळा केल्याचे प्रकरण समोर आले होते.
 
पेट्रोल वेन्डिंग मशिनमध्ये झालेल्या छेडछाडीमुळे ग्राहकाला ४ ते ५ टक्के पेट्रोल कमी मिळायचे. म्हणजेच एका लिटरमागे जवळपास २० मिलीलिटर इंधनाचा अर्थात लाखोंचा घोटाळा होत होता. याप्रकरणी माहिती मिळाल्यानंतर कारवाईला सुरवात करण्यात आली.
 
दरम्यान, अश्या प्रकारे चिपद्वारे होत असलेली पेट्रोलचोरी पकडण्यासाठी ठाणे क्राईम ब्रांचकडून राज्यभरातील अनेक जिल्ह्यात धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. मागील एक महिन्यात ठाण्यातील तब्बल ९८ पेट्रोलपंप या घोटाळ्यात सामील असल्याचे आढळून आल्याने हि पेट्रोल पंप सील करण्यात आली आहेत. त्यामुळे आता पुण्यातून कोण-कोणत्या पेट्रोल पंपांवरील घोटाळा उघडकीस येणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या : 
जोगेश्वरीत बेकरीची चिमणी कोसळल्याने तिघांचा मृत्यू, 2 जखमी
संगमनेर: २५० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त; वाळू तस्करांमध्ये खळबळ 
अयोध्येत राममंदिर कायदेशीर मार्गानेच: अमित शहा
खासगी, सरकारी जमिनीवर वनाच्छादन वाढविणार
शिवाजीराव पाटील यांचे निधन
शेतकऱ्यांना खरिपासाठी तातडीने मदतीचे वाटप
थेट चर्चेद्वारा तणाव कमी करा; भारत आणि चीनला पेंटॅगॉनचा सल्ला
काँग्रेस एकत्र आल्या, तर मोदी लाट रोखणे शक्‍य - पृथ्वीराज चव्हाण
...तर शाहबाज घेणार शरीफ यांची जागा
अमेरिकेच्या हल्ल्यात 16 पोलिस कर्मचारी ठार
सद्यःस्थितीमुळे 'पाक'ला मदत नाकारली: जीम मॅटीस

Web Title: pune news petrol pump sealed for manipulation