मॉर्निग वॉक करताना तहसिलदारांनी पकडले अवैध वाळूचे 2 ट्रॅक्‍टर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

गिरणा नदीतून अनधिकृतरित्या वाळू उपसा केला जात आहे. पहाटे आणि रात्री मोठ्या प्रमाणात ट्रॅक्‍टर आणि डंम्परमधून वाळू वाहतुक केली जात असते. यावर जिल्हा प्रशासनाने अनेकदा कारवाई करून देखील अवैध वाळू वाहतुक थांबत नसल्याचे चित्र आहे.

जळगाव : अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या ट्रॅंकर व डंम्पराविरूद्ध जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बळगा उचलला आहे. यात पहाटे मॉर्निंग वॉकला गेले असताना जळगाव तहसीलदार अमोल निकम यांनी अवैध वाळूची वाहतुक करणारे दोन ट्रॅंक्‍टरवर कारवाई केली. 

गिरणा नदीतून अनधिकृतरित्या वाळू उपसा केला जात आहे. पहाटे आणि रात्री मोठ्या प्रमाणात ट्रॅक्‍टर आणि डंम्परमधून वाळू वाहतुक केली जात असते. यावर जिल्हा प्रशासनाने अनेकदा कारवाई करून देखील अवैध वाळू वाहतुक थांबत नसल्याचे चित्र आहे. आज सकाळी नागझिरी शिवारातून वाळू घेवून जाणाऱ्या ट्रॅक्‍टर पकडण्याची कारवाई तहसिलदार निकम यांनी केली. जळगाव तहसिलदार अमोल निकम हे आज सकाळी सायकलींग करण्यासाठी गेले होते. मॉर्निंग वॉक करत असताना मेहेरुण शिवारात विना नंबरचे ट्रॅंक्‍टर नागझिरी शिवारातून मेहरुण येथे जात असतांना तहसिलदार निकम यांनी पकडून त्याच्या विरूद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला.

यानंतर तहसिलदार परत घराकडे जात असतांना पुन्हा नागझिरी शिवारातुन अवैध वाळू वाहतुक करणारे ट्रॅंक्‍टर (एम.एच.19, ए.एन 0352) हे पकडले. या ट्रॅक्‍टर चालकाविरूद्ध शहरातील रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: Jalgaon news tahsildar seized sand tractor