अकोला: करवाढीविरोधात महापालिकेवर भारिपचा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

करवाढीविरोधात महापालिकेवर भारिप बहुजन महासंघाने आज (बुधवार) भव्य मोर्चा काढला. जुनाच (पूर्वीच्या पद्धतीप्रमाणेच) कर भरण्याचे आवाहन ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

अकोला - करवाढीविरोधात महापालिकेवर भारिप बहुजन महासंघाने आज (बुधवार) भव्य मोर्चा काढला. जुनाच (पूर्वीच्या पद्धतीप्रमाणेच) कर भरण्याचे आवाहन ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. कर कमी करण्याची मागणी आयुक्त अजय लहाने यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

महापालिकेने मालमत्ता करात केलेली वाढ अवाजवी आहे. सर्व सामान्य जनतेला आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे जुन्या दरानेच कर भरणा करण्याची भूमिका भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. महापालिकेने मालमत्तांचे सर्व्हेक्षण केले आहे. त्यामुळे मालमत्तांच्या संख्येत वाढ होऊन नवीन मालमत्तांवर कर आकारणी झाली. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होणारच होती. त्यात आधीपासूनच कर भरणार करणाऱ्यांवर कर वाढ करण्याची गरज नव्हती. त्यानंतरही केलेली दरवाढ अवाजवी आहे. सर्व सामान्यांसह व्यापाऱ्यांना अडचणीत आणणारी आहे. त्यामुळे भारिप-बमसंने त्याला विरोध केला आहे. करवाढीविरोधात दुपारी 12 वाजता शहरातील पक्ष कार्यालय, शास्त्री स्टेडीयमवरून मोर्चा निघाला. महापालिका आयुक्तांसोबत त्यांनी चर्चा केली. यावेळी भारिपचे नगरसेवक उपस्थित होते.

अनेकांनी केला केशार्पणाने निषेध
भारीप बहुजन महासंघाचे नगरसेवक बबलू जगताप यांच्यासह कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर टक्कल करून करवाढीचा निषेध व्यक्त केला.

■ ई सकाळवरील ताज्या बातम्या 
मंजुळा शेट्येंवर पोलिसांनी केला लैंगिक अत्याचार- इंद्राणी मुखर्जी
पाऊस दिंडीत यात्रेकरूंनी केली बियांची पेरणी
'जेएनपीटी'ला रॅन्समवेअर व्हायरसचा फटका
पंढरपूर: गर्भपात करताना पोलिसांनी पकडले
दोन मुलांना जाळून मारणाऱ्या निर्दयी बापास अटक
शिवशाहीर डॉ. तनपुरे यांचा विनामुल्य व्याख्यानाचा निर्धार
मीरा कुमार यांनी दाखल केला अर्ज
बालक पालकमधला अव्या परत येतोय!
लोहगाव विमानतळावरील पार्किंग शुल्क होणार कमी

Web Title: marathi news akola news agiation corporation mahapalika news

फोटो गॅलरी