Viral Satya : नागिन डान्स केला आणि जीव गेला! (Video) 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 September 2019

नागिन डान्स करतानाच 30 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशातील खाटिया गावात घडली आहे. 

नागिन डान्स करतानाच 30 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशातील खाटिया गावात घडली आहे. 

गणपती विसर्जन मिरवणुकीत सगळेजण नाचत होते. मिरवणूक रंगात आली होती. नागिन डान्स करत असणाऱ्या या तरुणानं कधी विचारही केला नसेल की मृत्यू त्याची वाट बघतोय. पण, नको तेच झालं. नाचता नाचता हा तरुण जमिनीवर कोसळला. सगळ्यांना वाटलं त्याची डान्सची स्टाईल असावी. पण, तो पुन्हा उठलाच नसल्यानं त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा जागीच मृत्यू झाला.

हा धक्कादायक प्रकार मध्यप्रदेशमधील खाटिया गावात घडला आहे. नागिन डान्स करताना या तरुणाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. गुरुचरण ठाकूर असं या तरुणाचं नाव आहे. गुरुचरण हा नागिन डान्स करत असताना काहीजण व्हिडीओ बनवत होते. गुरूचरण नाचताना अचानक जमिनीवर कोसळल्यानं तिथल्या लोकांनी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्यानं सगळे प्रयत्न अपयशी ठरले. नाचता नाचता गुरुचरणचा मृत्यू झाल्यानं परिसरात शोककळा पसरली. पण,तुम्ही डान्स करत असाल तर काळजी घ्या.

 

***************************************************************

आणखी वाचा  : 

Viral Satya : रेड्याला शर्यतीला जुंपले अन् काय झाले पाहा (Video)

Viral Satya : रेड्याला शर्यतीला जुंपले अन् काय झाले पाहा (Video)

Viral Satya : पाकिस्तानात एक्सरे मशीनमधून निघाली माणसं ! (Video)

Viral Satya : गाडी चालवताना झोप लागल्यास उठवणारं यंत्र? (Video)

Viral Satya : आता मिळणार तिखट टोमॅटो? (Video)

Viral Satya : मशरूम खाल्ल्याने प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी? (Video)

Viral Satya : सापांना जीवदान देणारा स्नेकमॅन! (Video)

Viral Satya : मोबाईलमुळे तरूणाईला जडतोय 'नोमोफोबिया' आजार? (Video)

***************************************************************


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: viral satya video 30 year old youth dies while snake dance in Madhya Pradesh