Viral Satya : गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेला ठेंगणा घोडा (Video)

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 September 2019

जगातील सर्वांत छोट्या घोड्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अवघ्या 1 फूट 10 इंचीचा हा घोडा एवढा प्रसिद्ध झालाय की त्याला पाहण्यासाठीही लोकांची गर्दी असते.

शर्यतीत वेगानं पळणारा घोडा आपण पाहिला असेल...पण, आता जगातील सगळ्यात छोटा घोडा पाहा. जगातील सर्वांत छोट्या घोड्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अवघ्या 1 फूट 10 इंचीचा हा घोडा एवढा प्रसिद्ध झालाय की त्याला पाहण्यासाठीही लोकांची गर्दी असते. बॉम्बेल नावाचा हा घोडा पॉलंडमधील असून, त्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

या घोड्याची उंची जरी कमी असली तरी त्याच्या कामामुळं तो मालकाचा लाडका आहे. पोलंडमधील कासकाडा येथील फार्ममध्ये ठेवण्यात आला आहे. या घोड्याचे मालक पॅट्रीक आणि केटरजाइना यांनी 2014 मध्ये हा घोडा विकत घेतला. घोडा दोन महिन्यांचा असल्यानं त्याच्या उंचीबद्दल काहीच कळलं नाही. पण, वर्ष लोटलं तरीही उंची वाढत नसल्यानं याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये केली. त्यावेळी हा घोडा जगातील सर्वात छोटा घोडा असल्याचं समोर आलं.

घोडा छोटा असला तरी त्याचं काम खूप मोठं आहे. घोड्याचा मालक दर आठवड्याला घोड्याला हॉस्पिटलमध्ये नेतो. तिथे असलेल्या आजारी मुलांना छोटा घोडा दाखवल्यानं त्यांनाही कौतुक वाटतं आणि मुलांनाही गंमत वाटत असल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर हासू येतं. यामुळंच या घोड्याची चर्चा जगभर होत आहे.

***************************************************************

आणखी वाचा  :

Viral Satya : रेड्याला शर्यतीला जुंपले अन् काय झाले पाहा (Video)

Viral Satya : पाकिस्तानात एक्सरे मशीनमधून निघाली माणसं ! (Video)

Viral Satya : गाडी चालवताना झोप लागल्यास उठवणारं यंत्र? (Video)

Viral Satya : आता मिळणार तिखट टोमॅटो? (Video)

Viral Satya : मशरूम खाल्ल्याने प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी? (Video)

Viral Satya : सापांना जीवदान देणारा स्नेकमॅन! (Video)

Viral Satya : मोबाईलमुळे तरूणाईला जडतोय 'नोमोफोबिया' आजार? (Video)

***************************************************************


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Viral Satya Video The smallest horse in the world