Viral Satya : व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिनची ग्रुप मेंबरला पार्टी (Video)

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 September 2019

व्हॉट्सऍप ग्रूपचा ऍडमिन पार्टी देत नाय म्हणून ग्रूपचे मेंबर ग्रूप ऍडमिनची गंमत करत असतात. पण, एका ग्रूपच्या ऍडमिननं ग्रूपमधील 250 मेंबरला एकत्र बोलावून पार्टीच दिली. मग काय, दिवस-रात्र व्हॉट्सअपवर मेसेजवर मेसेज फॉरवर्ड करणारे सगळे मेंबर पार्टीला हजर झाले. पार्टीमध्ये ओळखीचेही मित्र भेटले आणि नवीन मित्रही भेटले. 

व्हॉट्सऍपवर मेसेजने बोलणारे गप्प बसतील तर कसले. भेटल्यानंतर सगळेजण गप्पा मारत होते. कुणी सामाजिक कार्यकर्ता होता, तर कुणी राजकीय नेता, कुणी पत्रकार तर कुणी अधिकारी. वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी एका ठिकाणी जमली होती. हे श्रेय जातं ते म्हणजे ग्रूप ऍडमिन प्रमोद पाटील यांना. प्रमोद पाटील यांनी पार्टीचं आयोजन केलं आणि ग्रूपमधील सगळ्या मेंबरला बोलावून घेतलं.

बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली इथे राहणाऱ्या प्रमोद पाटील यांनी 6 वर्षांपूर्वी ग्रूप बनवला होता. ग्रूपच्या वाढदिवसाचं निमित्त साधून त्यांनी ग्रूपचा वाढदिवस केक कापून दणक्यात साजरा केला आणि सदस्यांना चुलीवरच्या मराठमोळ्या जेवणाची पार्टी दिली.

व्हॉट्सऍप ग्रूप फक्त टाईमपाससाठी नसून, त्या ग्रूपच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसं जोडलेली आहेत. त्यामुळं कुण्या गरजूला मदत असे अनेक उपक्रम ग्रूपच्या माध्यमातून राबवले जातात. त्यामुळं सोशल मीडियाचा वाढता वापर पाहता नक्कीच सकारात्मक सदुपयोग बुलडाण्यात तरुणांनी केल्याचं पाहायला मिळालंय.

***************************************************************

आणखी वाचा  : 

Viral Satya : नागिन डान्स केला आणि जीव गेला! (Video)

Viral Satya : रेड्याला शर्यतीला जुंपले अन् काय झाले पाहा (Video)

Viral Satya : रेड्याला शर्यतीला जुंपले अन् काय झाले पाहा (Video)

Viral Satya : पाकिस्तानात एक्सरे मशीनमधून निघाली माणसं ! (Video)

Viral Satya : गाडी चालवताना झोप लागल्यास उठवणारं यंत्र? (Video)

Viral Satya : आता मिळणार तिखट टोमॅटो? (Video)

Viral Satya : मशरूम खाल्ल्याने प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी? (Video)

Viral Satya : सापांना जीवदान देणारा स्नेकमॅन! (Video)

Viral Satya : मोबाईलमुळे तरूणाईला जडतोय 'नोमोफोबिया' आजार? (Video)

***************************************************************

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Viral Satya video WhatsApp Group Admin Party Member Party