Akola Marathi News Crime is rampant in Murtijapurs Gharkul colony
Akola Marathi News Crime is rampant in Murtijapurs Gharkul colony 
अकोला

मूर्तिजापूरच्या घरकुल वसाहतीत फोफावतेय गून्हेगारी

सकाळ वृत्तसेेवा

मूर्तिजापूर (जि.अकोला) : मूर्तिजापूर शहरातील घरकूल वसाहतींमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावत असल्याचे अलीकडच्या काही घटनांवरून सिद्ध होत असून संबंधित यंत्रणांकडून अशा प्रवृत्तींना वेळीच आवर घातला गेला नाही, तर गुन्हेगारीचे एक नविन अघोषित केंद्र निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या शहरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत २ घरकूल वसाहती आहेत. ज्यांच्या नावावर घरकूल आहे, अशी कुटूंबे या घरकुलांमध्ये विरळाच आहेत. बहुतांश भाडेकरू आहेत व त्यातील काही, तर लांबून आलेले आहेत.

काही दिवसांपूर्वी या वसाहतीजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर अज्ञात वाहनाखाली आल्याने मृत्यूमुखी पडलेला एक युवक तर काही दिवसांपूर्वीच कोलकात्याहून या वसाहतीत रहायला आला होता.

एका वसाहतीत वर्षभरापूर्वी अवैध पेट्रोल-डिझेल साठा असल्याचे आग लागल्यामुळे निदर्शनास आले होते. चोरटे आणि लुटारूंनी या भागात आश्रय घेतल्याचेही प्रकार घडले आहेत, काही दिवसांपूर्वी लगतच्या एका कॉलनीतील कुत्र्याची चोरून नेऊन विक्री करण्याचा प्रकार, तेथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे व पोलीसांच्या सहकार्याने हाणून पाडण्यात आला होता,

त्याही पूर्वी या कॕलनीतील मंदीरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली होती आणि काल तर या वसाहतीत नंगी तलवार घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या माथेफेरू युवकाला पोलीसांनी गजाआड केले.


अशी एकूण पार्श्वभूमी असलेल्या या घरकूल वसाहतींमध्ये बहुतांश लाभार्थ्यांनी आपली घरकुले भाड्याने दिलेली आहेत व ती भाड्याने घेणाऱ्यांमधील काहींचे अवैध व्यवसाय आहेत. त्यामुळे या भागात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागली असून भविष्यातील अंडरवर्ल्डचा केंद्रबिंदू होण्यापासून या वसाहती वाचवायच्या असतील आणि खरा गरजवंत तेथील निवासी व्हावयाचा असेल, तर ज्याच्या नावावर घरकूल आहे, तोच त्या घरकुलात रहातो,

याबाबत शहानिशा करवून घेण्याची गरज आहे. त्यांचे नागरिकत्व तपासण्याचीही गरज आहे. ही जबाबदारी पालिका प्रशासनासह पोलीस विभागाची असून या दोन्ही यंत्रणांनी या वसाहतींमधील खरे लाभार्थी व गरजवंतांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. त्यासाठी काही सामाजिक संघटना व नगरसेवक आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

हेही वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT