Akola News covid vaccination from a private hospital from today 
अकोला

खासगी रुग्णालयातून कोविड लसीकरण आजपासून

सकाळ वृत्तसेेवा

अकोला  : जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी तसेच फ्रन्टलाईनवर काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. केन्द्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात दुसरा टप्प्या सुरू करण्यात आला असून यात ६० वर्षावरील वयोवृद्ध व ४५ वरील वयोगटातील दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील शासकीय कोविड लसीकरण केंद्रावर लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. याबाबतची खाजगी लसीकरण केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत नियोजन भवनात आयोजित करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा शल्य चिकीत्सक तथा प्रभारी उपसंचालक आरोग्य डॉ. राजकुमार चव्हान, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, डॉ. अश्वीनी खडसे, डॉ. अनुप चौधरी आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयातून लसीकरण बुधवार ( ता. ३) पासून करण्यात येणार आहे.
------------
६०४ जणांचे लसीकरण
शासकीय लसीकरण केंद्रांवर ६०४ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. यात ६० वर्षावरील ४०६ वयोवृद्धाचा तर ४५ ते ५९ वयातील दुर्धर आजार असणाऱ्या ३४ व्यक्तींचा आणि १६१ इतर व्यक्तींचा समावेश आहे.
----------
या रूग्णालयांचा समावेश
संत तुकाराम हॉस्पीटल, सिटी हॉस्पीटल, माऊली मॅटरनिटी व सर्जिकल हॉस्पीटल, डॉ. के.एस. पाटील हॉस्पीटल ॲन्ड पॉलिक्लिनिक हॉस्पीटल, श्रीमती बी.एल. चांडक रिसर्ज फाऊंडेशन(वसंती हॉस्पीटल) आणि शुक्ला मल्टीस्पेशलीटी हॉस्पीटल या रूग्णालयांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येईल.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा सुनेत्रा पवारांसह उद्धव ठाकरेंना धक्का; राष्ट्रवादी नगरसेवकांसह ठाकरे गटाचे पदाधिकारी शिवसेनेत

IPO News: पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल! Shiprocket अन् Behari Lal Engineering ची बंपर लिस्टिंग; कुणाला सर्वाधिक रिटर्न?

Nagpur School Bomb Threat: शहरातील १८ शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी; संघ कार्यालय, केंद्रीय विद्यालयासह प्रसिद्ध शाळांचा समावेश; बीडीडीएस, श्वान पथकाकडून तपासणी

Marathi News Live Updates : संजय राऊतांची निवडणूक आयोगावर सडकून टीका, काय म्हणाले?

Sunetra Pawar: चिमुकली हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आक्रमक; आरोपीवर कठोर कारवाई, फास्ट ट्रॅक कोर्टासाठी हालचाली

SCROLL FOR NEXT