akola news in murtijapur Antelope died in Accident 
अकोला

राजबिंडे काळविट ओलांडत होते रस्ता, अचानक आलेल्या वाहनाने जागेवरच घेतला बळी

अविनाश बेलाडकर

मूर्तिजापूर (जि.अकोला)  : राष्ट्रीय महामार्गाच्या बाजुचा हा परीसर वनक्षेत्राचा आहे. या भागात ब-याचदा वन्य प्राणी आढळतात. रस्ता पार करतांना नजरेस पडतात. अपघातासही कारणीभूत ठरतात. निलगायी, रानडुकरे, हरणांचा या भागात स्वैरसंचार असतो. आसेच एक काळविट रस्ता ओलांडत असताना एका भरधाव वाहनाने त्याला धडक दिली. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर कुत्र्यांनी त्याला फरफटत जवळच्या शेतात नेले व त्याचे लचके तोडू लागले. लगेच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोचले. काळविटाच्या मृतदेहाचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून शवविच्छेदन करण्यात आले व मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली

 
अज्ञात वाहनाने धडक दिल्याने काळविटाचा मृत्यू झाला. आम्ही ताबडतोब घटनास्थळी पोचलो. वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काळविटाचे शवविच्छेदन करण्यात आले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली.
-प्रगती हरणे,  वनरक्षक, कुरुम क्षेत्र, मूर्तिजापूर. 

अमरावती वरून मुर्तिजापूर कडे येत असताना अमन हॉटेल जवळ उजव्या बाजूला दोन कुत्री एका नर हरीणा (काळवीट) चे लचके तोडत आसल्याचे निदर्शनास आले. मी माना पोलीस स्टेशनला फोन सुद्धा केला वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सुद्धा फोन केला. रोड वरील गाड्यांची मदत सुध्दा घेतली पण त्या हरीण ला कोणी गाडीत टाकून घ्याला तयार नसल्याने घायाळ हरीण जागीच गतप्राण झाले. अशा वेळी वन विभागाची तात्काळ मदत मिळावी ही अपेक्षा आहे. 
-सचिन गावंडे, अध्यक्ष, राष्ट्रमाता
 जिजाऊ बहुउद्देशीय संस्था, मूर्तिजापूर. 
--------------------------------------

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT