Akola News Talents of Akola will present children's literature!
Akola News Talents of Akola will present children's literature! 
अकोला

मराठी राजभाषा दिन : अकोल्याचे बालकलावंत सादर करणार प्रतिभावंतांचे बालसाहित्य!

सकाळ वृत्तसेवा

अकोला : भाषेचा विकास साहित्यातून होत असतो. मराठी भाषेला तर समृद्ध साहित्याची परंपराच लाभली आहे. विद्यार्थ्यांना मराठी साहित्याची गोडी लागावी व मातृभाषेविषयी आत्मियता निमार्ण व्हावी, या उद्देशाने विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोला अभिनव उपक्रम घेत असते.

या उपक्रमांचा भाग म्हणून मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून ’’प्रतिभावंतांचे बालसाहित्य बालकांच्या ओठी'' हा कार्यक्रम आभासी ऑनलाईन पद्धतीने शनिवार दि.२७फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. विदर्भ साहित्य संघ, अकोला शाखेच्या यूट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम संध्याकाळी ५ वाजता प्रसारित केला जाणार आहे.
या अपूर्व अशा कार्यक्रमात बालशिवाजी शाळा, कोठारी कॉन्व्हेंट, स्कूल ऑफ स्कालर्स (हिंगणा रोड), न्यू इंग्लिश हायस्कूल, आरडीजी पब्लिक स्कूलआणि प्रभात किड्स स्कूल या शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.त्यांनी ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज, वि. दा. करंदीकर, गिरीजा कीर यांचे निवडक बालसाहित्य, कविता, बाल नाटिका, नाट्यछटा, कथाकथन अत्यंत सुंदर रितीने सादर केले आहे.

बाल शिवाजी शाळेचे विद्यार्थी मंजिरी देशमुख, कांचन कवडे, वरदा बिडवई; न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी शेखर डांगे, यश बेलेकर, मधुरा परचुरे, अदिती तेलंग; कोठारी कॉन्व्हेंटची गार्गी व्यास, जिगीशा गर्गे, स्कूल ऑफ स्कालर्सच्या मधुरा कुलकर्णी, प्राची लाहोळकर, रिदवी अग्रवाल व श्रेया शेगोकार; आरडीजी पब्लिक स्कूलचा सोहन बोरकर, उत्तरा पुरकर आणि गौरी पुरकर; प्रभात किड्स स्कूलची कृष्णाई देशमुख, अंतरा गद्रे, अन्वी जायभाये आणि ईश्वरी पाटील यांनी मराठीतील विविध बालसाहित्य अत्यंत बहारदार पद्धतीने सादर केले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन प्रभात किड्स स्कूलची विद्यार्थीनी स्निग्धा देशमुख हिने केले आहे. युट्यूबवर प्रसारित होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलात्मक सादरीकरणाचा आस्वाद घेत त्यांच्या सादरीकरणाला दाद देण्याचे आवाहन विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोलाच्या वतीने करण्यात आले आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पुणे-बंगळुरू महामार्गावर मोठी कोंडी; पुण्याहून कोल्हापूरला जाणारी वाहतूक संथ गतीने

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश म्हस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Viral Video: पत्नी जावायाच्या प्रेमात पडल्याचे कळताच पतीने लावून दिले लग्न, टाळ्यांच्या कडकडाटात गावानेही केले स्वागत

Mazi Tuzi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ'चा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला; मालिकेत करण्यात आले 'हे' बदल

Abhijeet bhattacharya: "लग्नात गाणं गायल्यानं औकात कमी होते", म्हणणाऱ्या अभिजीत भट्टाचार्यांना गायकानं व्हिडीओ शेअर करत दिलं सडेतोड उत्तर

SCROLL FOR NEXT