Akola Washim Corona News Towards lockdown: Violation of rules will result in filing of cases, Collector orders 
अकोला

लॉकडाउच्या दिशेने: नियम मोडल्यास होणार गुन्हे दाखल, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सकाळ वृत्तसेेवा

वाशीम : केंद्र सरकारनं  कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु केला आहे. महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यामधील कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली आहे. यवतमाळ, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्ण वाढत असल्याचं दिसून येत आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करणं गरजेचे झालं आहे.

अनलॉक फेज मध्ये नागरिकांनी कुठलीही काळजी न घेतल्याने आणि शाळा, हॉटेल, लग्न प्रसंग , समारंभ यातून जास्त लागण नागरिकांना झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाची लस आली आहे आता कोणतीही खबरदारी घ्यावी लागणार नाही. या अविर्भावाने ही रुग्ण वाढले  असल्याने प्रशासनानसह आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे.

दरम्यान, जिल्ह्यामधे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी बुधवारी (ता.१७) तातडीच्या बैठकीत कठोर उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामीण व शहरी भागात होणाऱ्या समारंभावर विषेश लक्ष असणार असून, नियमीत भाजी बाजार व आठवडी बाजाराचे विकेंद्रीकरण करण्याचे आदेश बजाण्यात आले आहेत.


गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यामधे कोरोना रुग्णांच्या संखेत लक्षणीय वाढ होत आहे. या रुग्णवाढीमध्ये ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. ग्रामीण भागात लग्न व इतर समारंभात बेफाम गर्दी होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी याबाबत दोन वेळा आदेश दिले होते, मात्र गर्दीवर अंकूश बसण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या अनुषंगाने बुधवारी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा - Corona Update : पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी

तर ग्रामसेवक जबाबदार
ग्रामीण भागात लग्न व इतर समारंभात पन्नास जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. यामध्येही मास्क व सॅनिटायझरसह सामाजिक दुराव्याचा नियम कठोरपणे पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच या कायद्याचे उल्लंघन झाल्यास ग्रामीण भागात ग्रामसेवक, तलाठी व पोलिस पाटील हेच जबाबदार राहणार आहेत. मुख्य कार्यान्वनाची जबाबदारी ग्रामसेवकावरच राहणार आहे.

हेही वाचा - रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन ?

वर-वधू पित्यासह मंडप कंत्राटदार रडारवर
शहरी भागात लग्न व इतर समारंभ हे मंगल कार्यालयात आयोजित केले जातात. याबाबत मंगल कार्यालय मालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत, मात्र ग्रामीण भागात लग्न व इतर समारंभ हे मंडप टाकून उघड्यावर साजरे केले जातात. या अनुषंगानेच जिल्हाधिकाऱ्यांनी लग्नमंडप कंत्राटदार व वर-वधू पितांनी या कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, असे आदेश बजावण्यात आले आहेत.

हेही वाचा - या टोळीचे कारणामे बघून तुम्हीही अचंबित व्हाल, एक-दोन नव्हे चक्क २२ ठिकाणी केली चोरी
 
आठवडी व नियमित बाजाराचे विकेंद्रीकरण
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आता भाजीबाजाराचे विकेंद्रीकरण करण्याचे आदेश बजाण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील आठवडी बाजारात सामाजिक दुरावा रहावा याची जबाबदारी ग्रामसेवकावर राहणार आहे. शहरी भागात बाजारपेठेत कोरोना नियमाचे उल्लंघन झाल्यास दुकानदारावर कारवाई होणार आहे. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या या कडक आदेशाने परिस्थिती बदण्यास मदत होणार असल्याची शक्यता आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS T20I : भारत-ऑस्ट्रेलिया पुढचा सामना केव्हा? जाणून घ्या तारीख, ठिकाण, वेळ अन् live streaming details

Devendra Fadanvis Sugarcane Protest : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न; कोल्हापुरात ऊस दरावरून आंदोलन चिघळले, Video

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरात शिंदे सेनेच्या मेळाव्यापूर्वी कर्मचाऱ्याला विजेचा धक्का

किती तो वेंधळेपणा! गाडीत बसली, स्टेअरिंग हातात घेतलं पण लगेच खाली उतरली; तेजश्रीचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल हसू

Diabetes Breakthrough Discovery: आता रक्तातूनच समजणार डायबिटीजचा धोका; आयआयटी मुंबईतील संशोधकांचा शोध

SCROLL FOR NEXT