gofan article esakal
Blog | ब्लॉग

गोफण | जावळाचा कार्यक्रम अन् काका-पुतण्याची गुप्त भेट

संतोष कानडे

काकासाहेबांचे दादासाहेबांसी तातडीचे फर्मान

प्रति,

दादाराव दणगटे,

निर्धार सभामंडप, कर्जतपुरी

(दुसरा गट, देशहितवादी पक्ष)

आपणांस कळविण्यास आनंद होतो की, आपली गाडी ट्रॅकवर आहे. मात्र गाडीचा वेग जरा प्रमाणापेक्षा वाढलेला दिसतोय. आमच्या ट्रॅकिंग ऑपरेशन रडारवर ते निदर्शनास आलेय. आपणच नाही तर आपल्या सहकाऱ्यांनीही अतिवेग धारण केलाय. एवढी घाई या कार्यालयास अन् पर्यायाने काकासाहेबांस अपेक्षित नाही. आपल्या या बेछूट वेगाला आवर घालण्यासाठी अन् सबुरीचे डोस देण्यासाठी एक बैठक आयोजित केली आहे.

माननीय साहेबांनी कळवले आहे की, दूरच्या (कुठल्यातरी) मावस मामाच्या चुलत भावाच्या मेव्हण्याच्या आत्याच्या पुतण्याच्या मुलाचा जावळ काढण्याचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमास खुद्द साहेब जाणार आहेत. साहेबांनीही आपणाला त्याच कार्यक्रमात हजर राहण्याचे फर्मान धाडले आहे.

साहेब स्वतः उत्सवी चिमुकल्यास मांडीवर घेतील आणि तुम्हास जावळ काढण्याचा मान मिळेल. त्याच दरम्यान एक अनौपचारिक बोलणी होईल, त्याच घडामोडीस बैठक असे समजावे. साहेब आपणाला मोलाचे सल्ले देणार आहेत... ते ग्रहण करुन तुम्हास तातडीने त्यावर अंमल करावयाचा आहे.

तद्पर्यंत आपण आपल्या जिभेस ताब्यात ठेवणे; असे साहेबांचे फर्मान आहे. साहेब म्हणतात, कर्जती जे काही घडते आहे ते भलेही ठरलेले असेल.. पण किती तो तोरा? काय बोलावे.. कसे बोलावे.. कुणाशी बोलावे... कुणासंबंधी बोलावे? काही धरबंध आहे की नाही?

साहेब संतप्त होत पुढे सांगतात- लौकिक असा आहे की, एकदा तुम्ही फुटले की फुटले, पुन्हा तुम्हास थारा नाही. पण आपली वहिवाट निराळी. आपल्याला हे मोडून काढावयाचे आहे-कुटुंबकबिला सांभाळायचा आहे. म्हणूनच आपल्या गाठी-भेटी होत राहिल्या अन् पुढेही होत राहतील.

साहेब व्यथित आहेत. ते म्हणतात- फुटून गेल्यानंतर तुम्ही आम्हास भेटावयास आले. तेव्हा म्हणता कसे, साहेबांचं मन वळविण्याकामी आलोय अन् आता पलटून म्हणता साहेबांनीच बोलावलं.. गाडी ट्रॅकवरय असं सांगितलं. किती हा उथळपणा. राजकारण करताना जरातरी खोली गाठावी लागेल की नाही?

साहेब अन् आपण जाहीर कार्यक्रमात असता तेव्हा ब्र शब्द काढत नाही अन् बंद दाराआड मात्र वरचेवर भेटी होतच राहतात. त्यामुळे लोकांना हा लबाडपणा वाटतो. म्हणून इथून पुढे जाहीर कार्यक्रमात साधा नमस्कार-चमत्कार तरी झालाच पाहिजे. शिवाय तेव्हाचे ते प्रमुख पदासाठीचे आंदोलन साहेबांनीच घडविले, असं बोलणं योग्य नाही.

आदरणीय दादाराव, साहेब आपणावर खप्पामर्जी करुन बसलेले आहेत. त्यामुळे जावळाचा कार्यक्रम घडवून आणलेला आहे... त्यासाठीची ही निमंत्रण पत्रिका. कुणासही कानोकान खबर होऊ न देणे... नसता काही गल्लत झालीच तर आपले जहागीरदारपणाचे ते जुने स्वप्न पुन्हा भंग पावेल.

तेव्हा काळजी घ्यावी, असे साहेबांस वाटते!

ता.क.- ढेरीचा तो नामोल्लेख आस्मादिकांना जराही पटलेला नाही. असो.

प्रेषक,

जितूभाऊ अवघडे द्वारा काकासाहेब दणगटे

वाक्चातुर्य गटप्रमुख

(पहिला गट, देशहितवादी पक्ष)

समाप्त

'गोफण'चे सर्व भाग वाचण्यासाठी खाली लिंक दिल्या आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT