Satara Powai Naka
Satara Powai Naka esakal
Blog | ब्लॉग

Satara : तब्बल 61 वर्षे शिवरायांच्या पुतळ्याला साक्षी ठेवत साताऱ्यात अनेक घडामोडी घडल्या, पण आता..

गिरीश चव्हाण

लोकनेत्यांच्या एखाद्या स्मारकावरून वादंग निर्माण होणे अत्यंत चुकीचे आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कर्तृत्‍व सीमित करण्‍याचा तो एक भाग होईल.

अटकेपार झेंडा रोवणाऱ्या मराठा साम्राज्‍याच्‍या राजधानीतील पोवई नाका (Satara Powai Naka) परिसराला ऐतिहासिक महत्त्व आहे. या परिसरात असणारा छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा आगळा-वेगळा पुतळा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या मानबिंदूला राजधानीच्‍या बाजाचे रुपडे देण्‍याचा प्रयत्‍न गेले काही दिवस सुरू आहे.

हे प्रयत्‍न सुरू असतानाच त्‍या परिसरात लोकनेते बाळासाहेब देसाई (Balasaheb Desai) यांच्‍या नावाने चौक तयार करण्‍याच्‍या हालचाली सुरू झाल्या आहेत. या हालचालींना सातारकरांनी विरोध दर्शविण्‍यास सुरुवात केली आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनीच या शिवपुतळ्याचे ६१ वर्षांपूर्वी अनावरण केले होते. ज्‍यांनी या पुतळ्याचे अनावरण केले, त्‍यांचेच राजकीय वारस शंभूराज देसाई यांच्‍याकडून असा प्रयत्‍न होत आहे.

पोवई नाक्यावरील आठ रस्त्यांवर छत्रपती वगळता अन्य कोणत्या नेत्याचा चौक करण्याचा प्रयत्न ‍खुद्द लोकनेते बाळासाहेब देसाई यांनाही पटला नसता. लोकनेत्यांचे कार्यही वादातीत आहे. त्यामुळे त्यांच्या नावावरून होणाऱ्या कोणत्याही गोष्टीवरून वाद निर्माण होणे, हेही चुकीचे आहे. त्याचबरोबर सातारकरांच्या भावनाही जपल्या गेल्या पाहिजेत. याचे भान ठेवतच त्यांच्या राजकीय वारसदारांकडून पावले टाकणे अपेक्षित आहे.

सातारा शहराची ओळख व मुख्‍य भाग असणाऱ्या पोवई नाका परिसराला अन्‍ययसाधारण महत्त्‍व आहे. हे महत्त्‍व याठिकाणी होणाऱ्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक घडामोडी आणि घटनांनी वेळोवेळी अधोरेखित केले आहे. या ठिकाणाचे महत्त्‍व ओळखत ६१ वर्षांपूर्वी याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा तोफेसह युद्धसज्ज रूपातील पुतळा उभारण्‍यात आला. या पुतळ्याचे अनावरण दस्‍तुरखुद्द लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्‍या हस्‍ते झाले होते.

यासाठी त्‍यावेळी शिवस्‍मारक समिती कार्यरत होती. संपूर्ण राज्‍यात आणि देशात अशा रूपातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठेही नसून, ती बाब सातारकरांसाठी अभिमानाची आहे. गेली ६१ वर्षे साताऱ्यात येणाऱ्या प्रत्येकाला शिवछत्रपतींचा हा पुतळा संघर्षाची प्रेरणा व लढण्याचे बळ देत आहे. पुतळ्याला साक्षी ठेवत साताऱ्यात अनेक घटना, घडामोडी आणि राजकीय उलथापालथी झाल्या आहेत.

यानंतर या परिसराचे महत्त्‍व वाढेल, असेच प्रयत्‍न विविध पातळ्यांवरून कायम होत राहिले आहेत. आता या परिसराच्या विकासातील एका गोष्टीवरून विरोधाच ठिणगी पडली आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्‍याविषयी संपूर्ण राज्‍याला आदर आणि प्रेम आहे. त्‍यांनी दिलेल्‍या योगदानामुळे राज्‍याचा विकासरथ गतिमान होण्‍यास मदत झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तींमध्ये आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांचा वारसा पालकमंत्री शंभूराज देसाई हे चालवत आहेत.

त्यांनी पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात एक चौक तयार करून त्याला लोकनेत्यांचे नाव देऊन तेथे शिल्पचित्र उभारण्याचे ठरवले आहे. त्या संदर्भात शुक्रवारी (ता. १६) जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी यांची बैठक बोलावली आहे. ही गोष्ट समोर आल्यानंतर सातारकरांमध्ये त्या विरोधात सूर उमटू लागला आहे.

विविध सामाजिक संघटनांबरोबरच राजमाता कल्पनाराजे भोसले यांनीही या ठिकाणी भेट देऊन याला विरोध दर्शविला आहे. त्यानंतर साताऱ्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्येही याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. युगपुरुष असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पुतळ्याचे अनावरण ज्‍यांच्‍या हस्‍ते झाले, त्‍यांचे वारसच या पुतळा परिसराचे महत्त्‍व कमी करण्‍याच्‍या प्रयत्‍नात असल्‍याचे समजल्यावर सातारकरांना धक्का बसला आहे.

इतर अनेक कामे बाळासाहेब देसाई यांच्‍या नावाने उभी करणे, त्‍यांची राजकीय विचारधारा जोपासणे शक्‍य असतानाही शंभूराज देसाई यांच्‍याकडून पोवई नाक्यावरच असा घाट घालणे सातारकरांना पचताना दिसत नाही. हे खुद्द बाळासाहेबांनाही पटले नसते. आता याप्रकरणावरून साताऱ्यात रोष निर्माण होऊ लागला आहे. या रोषातून साताऱ्यात याप्रकरणातून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा निर्णय त्‍यांनी मागे न घेतल्‍यास सातारकरही नटाला.. नट आणि खटाला.. खट अशी भूमिका घेण्‍यास कचरणार नाहीत, हे निश्‍चित.

विवेकाने पाऊले उचला…

लोकनेत्यांच्या एखाद्या स्मारकावरून वादंग निर्माण होणे अत्यंत चुकीचे आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कर्तृत्‍व सीमित करण्‍याचा तो एक भाग होईल. लोकनेत्यांचे स्मारक साताऱ्यात अन्यत्र कुठेही होऊ शकते. त्यामुळे हटवादी भूमिका सोडून दोन्ही बाजूने संयम व विवेकाने पावले उचलणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT