Astrology esakal
संस्कृती

Astrology : 'या' राशींचे भाग्य उजळेल सूर्यासारखे

सूर्याचे भ्रमण आता सिंह राशीतून कन्या राशीत होत असल्याने हा सुर्य गोचर योग काही राशींसाठी भाग्य उजळवणारा योग ठरणार आहे. जाणून घेऊ.

सकाळ डिजिटल टीम

हायलाईट्स

  • ग्रहांचा राजा सूर्याची राशी बदलणार आहे.

  • १७ सप्टेंबर रोजी सूर्य सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल.

  • सूर्याचा हा राशी परिवर्तन सकाळी ७ वाजून ३५ मिनीटांच्या सुमारास होईल

Surya Rashi Parivartan 2022 : ग्रहांचा राजा सूर्याची राशी बदलणार आहे. १७ सप्टेंबर रोजी सूर्य सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल. सूर्याचा हे राशी परिवर्तन सकाळी ७ वाजून ३५ मिनीटांच्या सुमारास होईल. यानंतर १६ऑक्टोबरपर्यंत सूर्य सिंह राशीत राहील.

सूर्य कन्या राशीत प्रवेश केल्यावर अनेक राशींना शुभ परिणाम मिळतील असे ज्योतिषी सांगतात. तर काही राशींच्या अडचणी वाढताना दिसतील. मेष, कर्क, कन्या, तूळ, वृश्चिक, धनू आणि मीन राशीचे भाग्य सूर्याच्या राशी बदलानंतर चमकू शकते.

मेष रास- अडकलेली कामे पूर्ण होतील

मेष राशीच्या लोकांची सर्व कामे पूर्ण होतील. विशेषत: जी कामे पूर्ण होण्यात अडथळे येत होते त्यात तुम्हाला यश मिळेल. आरोग्याच्या दृष्टीकोनातून देखील तुम्हाला तुमच्या आरोग्यात सुधारणा दिसून येईल आणि तुम्ही चांगले आणि निरोगी जीवनाचा आनंद घ्याल.

वृषभ रास - मानसिक ताणही वाढेल

वृषभ राशीसाठी थोडा त्रासदायक काळ जाण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला मोठा निर्णय घेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे तुमचा मानसिक ताणही वाढू शकतो.

मिथुन रास - आरोग्य आणि मानसिक समस्या उद्भवतील

मिथुन राशीच्या लोकांमध्ये या संक्रमणानंतर आरोग्य आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात, कारण या संक्रमणामुळे तुमचा मानसिक ताण वाढेल. मित्र आणि नातेवाईकांशी संबंध बिघडू शकतात. यावेळी तुम्हाला थोडे सावध राहण्याची गरज आहे.

कर्क रास - अनुकूल काळ

कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे संक्रमण अनुकूल राहील. तुमच्या आरोग्याशी संबंधित सर्व समस्या दूर होताना दिसतील. विशेषत: जे लोक त्यांच्या मागील काही आजारांमुळे बराच काळ त्रस्त होते, त्यांना आराम मिळू शकतो.

सिंह रास - निर्णय घेताना थोडा विचार करा

सूर्याचे संक्रमण तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही. निर्णय घेताना थोडा विचार करावा असा सल्ला दिला जातो. वाणी दोषांमुळे आर्थिक करिअरच्या आघाडीवर नुकसान होऊ शकते. प्रत्येक परिस्थितीत स्वतःला शक्य तितके शांत ठेवा.

कन्या रास - खर्चातून दिलासा मिळणे कठीण

कन्या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण सामान्य राहणार आहे. तुमचे आयुष्य जसे चालले होते तसेच चालेल. उत्पन्नाच्या स्रोतातून पुरेसा पैसा मिळत राहील. मात्र, तरीही खर्चातून दिलासा मिळणे कठीण आहे. तब्येत ठीक राहील.

तूळ रास - परदेश दौऱ्याची शक्यता

सूर्याच्या भ्रमणानंतर तूळ राशीच्या लोकांसाठी परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. विशेषत: जे लोक परदेशात जाण्यास इच्छुक होते आणि बरेच दिवस प्रयत्न करत होते, त्यांना सूर्यदेव लवकरच काही चांगली बातमी देऊ शकतात.

वृश्चिक रास - उत्पन्नाचे स्रोत वाढतील

आर्थिक जीवनात तुमच्या उत्पन्नाचे स्रोतही वाढतील आणि एकापेक्षा जास्त माध्यमातून उत्पन्न मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मिळालेल्या या धनामुळे तुम्हाला अनेक सिद्धी प्राप्त होतील. कौटुंबिक जीवनातही घरातील शांततेचे वातावरण तुम्हाला मानसिक आनंद देईल.

धनु रास - सर्व समस्यांपासून आराम

जर तुम्ही व्यवसायाशी संबंधित असाल तर सूर्य देव चांगल्या आणि नवीन संधी देणार आहेत. व्यवसायाचा विस्तार होईल. नफ्याची टक्केवारीही दुप्पट होईल. जर तुमची प्रकृती खूप दिवसांपासून खराब होत असेल तर सूर्यदेवाच्या प्रभावाने तुम्हाला त्या सर्व समस्यांपासून आराम मिळेल.

मकर रास - काळ थोडा कठीण

मकर राशीच्या लोकांसाठी काळ थोडा कठीण जाणार आहे. लोकांशी वाद घालणे तुमचे नुकसान करेल. ऑफिसमधील सहकाऱ्यांशी संबंध बिघडू शकतात, मानसिक तणाव होऊ शकतो. संपूर्ण परिस्थिती समजून घेतल्याशिवाय तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कोणत्याही गोष्टीवर तुमचे मत देण्याची गरज नाही.

कुंभ रास - खर्चावर नियंत्रण ठेवा

आर्थिक जीवनाच्या दृष्टीने तुमचे वाढते खर्च यावेळी तुमच्यासाठी तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरतील. त्यामुळे तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. कुंभ राशीच्या विवाहितांना या काळात जोडीदाराच्या कमकुवत आरोग्यामुळे अडचणी येतील.

मीन रास - नवीन आणि चांगल्या संधी मिळतील

मीन राशीच्या लोकांचा नोकरी व्यवसाय पूर्वीप्रमाणेच चालू राहील. तुम्हाला काही नवीन आणि चांगल्या संधीही मिळू शकतात. मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी किंवा नवीन वाहन खरेदीसाठी वेळ खूप चांगला आहे. या काळात तुम्हाला लग्नाचे प्रस्ताव देखील मिळू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT