delhi tractor parade republic day farmers protest farm law red fort
delhi tractor parade republic day farmers protest farm law red fort 
देश

शेतकऱ्यांची लाल किल्ल्यावर धडक; पोलिसांचा लाठीमार, हिंसाचार शेतकऱ्याचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

केंद्राने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांनी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढली. यावेळी आक्रमक झालेले शेतकरी नियोजित मार्ग सोडून जिथं परवानगी दिलेली नाही अशा मार्गावरूनही गेले. शेतकरी आंदोलक दिल्लीतील लाल किल्ल्यावर पोहोचले असून तिथं झेंडेही फडकावले. यानंतर शेतकरी नेत्यांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं असून हिंसा करणारे हे शेतकरी नसून राजकीय कार्यकर्ते असल्याचं म्हटलं आहे. 

Tractor Parade Live : शेतकरी ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून कृषी कायद्यांना विरोध शेतकऱ्यांनी केला. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांमुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर शेतकरी नेत्यांनी हात झटकले असून प्रतिक्रिया देताना म्हटलं की... वाचा सविस्तर

दिल्लीत आक्रमक झालेल्या शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, अश्रूधुराचा वापर केला असून यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. वाचा सविस्तर

दिल्ली पोलिसांनी ट्रॅक्टर परेडला परवानगी दिली होती. परंतु, आंदोलक शेतकऱ्यांनी निश्चित वेळेच्या आणि ठरलेल्या मार्गांपेक्षा इतर ठिकाणांहून परेड नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंदोलक ऐकत नव्हते म्हणून शेवटी पोलिसांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबला. वाचा सविस्तर

Tractor Parade: प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीवेळी शेतकरी आक्रमक झाले होते. यावेळी नियोजित मार्गावरून न जाता काही ठिकाणी आंदोलकांनी इतर मार्गावरून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टरही घालण्याचे प्रयत्न झाले. वाचा सविस्तर 

VIDEO : आंदोलनावेळी शेतकरी आक्रमक झाल्यानं दिल्ली सीमेवर गोंधळाची परिस्थती निर्माण झाली होती. यावेळी चिल्ला बॉर्डरवर स्टंट करताना एक ट्रॅक्टर पलटी झाला. वाचा सविस्तर

शांततापूर्ण आंदोलन करत असताना हिंसक वळण लागल्यानं आता आंदोलनातील नेत्यांनी हात झटकले आहेत. हिंसक आंदोलन करणारे आमचे शेतकरी नाहीत असं नेत्यांनी म्हटलं आहे. तसंच आंदोलकांना आवाहन करताना म्हटलं की... वाचा सविस्तर

दिल्लीतील लाल किल्ल्यात आंदोलक शेतकरी घुसले होते. यावेळी शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर झेंडेही फडकावले. पोलिसांनी ते झेंडे उतरवले असून आंदोलकांना बाहेर काढलं आहे. पाहा व्हिडिओ

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT