duparchya batmya
duparchya batmya 
देश

मुंबई पोलिस आयुक्त बदलावरून ठाकरे सरकारवर निशाणा ते देश 'टोल प्लाझा'मुक्त होणार; वाचा एका क्लिकवर

सकाळ डिजिटल टीम

राज्यात मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझे यांच्यावर कारवाई झाल्यानंतर मुंबई पोलिस आयुक्तांचीसुद्धा उचलबांगडी करण्यात आली. यानंतर हेमंत नगराळे यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे. मात्र यावरून विरोधकांकडून ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. दुसरीकडे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशातही कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकार पुढच्या एका वर्षात टोल मुक्त रस्ते करण्याच्या योजनेवर काम करत असल्याचं सांगितलं आहे. 

मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊथ यांनी केलेल्या ट्विटवर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. चुकीची कामं झाली तर वावटळीचं वादळात रूपांतर जनताच करेल", असा इशारा उपाध्ये यांनी दिला. वाचा सविस्तर

सचिन वाझे यांच्या विरोधात विविध पुरावे मिळत असल्याची चर्चा रंगल्यानंतर विरोधकांनी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी करायला सुरूवात केली. यातच मुंबई पोलिस आयुक्तांची बदली करण्याचा निर्णय मनसेला फार पटला नसून त्यांनी याबाबत प्रसिद्ध वेब सिरीज मिर्झापूरचा एक सीन शेअर करत त्यावर नाराजी व्यक्त केली. वाचा सविस्तर

अरुण भेलके हा माओवादी नेता दीपक ऊर्फ मिलिंद तेलतुंबडे सोबत माओवादी चळवळीत सक्रीय होता. जंगलात त्याची व आपली तेलतुंबडेच्या उपस्थित भेट व चर्चा झाली आहे, अशी साक्ष शरणागती पत्करलेल्या नक्षलवादी कृष्णा दोरपटे याने बुधवारी न्यायालयासमोर दिली. वाचा सविस्तर

पुण्यात एका दिवसात २ हजार ५८७ नवीन कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या वर्षभरात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण आढळले आहेत. याआधी १५ सप्टेंबर २०२० ला २ हजार १२० रुग्ण सापडले होते. वाचा सविस्तर

रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय की, सरकार पुढील एका वर्षात सर्व टोल प्लाझा समाप्त करण्याच्या योजनेवर काम करत आहे. येणाऱ्या काळात टेक्नोलॉजीच्या मदतीने लोकांना तितकाच टोल भरावा लागेल, जेवढा ते रस्त्याचा वापर करतील. वाचा सविस्तर

भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 35,871 रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही  1,14,74,605 वर पोहोचली आहे. काल देशात जितके रुग्ण सापडले आहेत त्यातील तब्बल 65 टक्के रुग्ण हे फक्त एकट्या महाराष्ट्र राज्यातील आहे. वाचा सविस्तर

ज्यो बायडेन म्हणाले की, 'पुतिन हे एक हत्त्यारे(killer) आहेत आणि त्यांना किंमत चुकवावी लागेल.' अमेरिकेकडून आलेल्या या  वक्तव्यानंतर रशियाने आपल्या राजदूताला चर्चेसाठी मॉस्कोमध्ये बोलावले आहे. रशियाचे हे एक मोठे राजनैतिक पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय. वाचा सविस्तर

ओडीसा सरकारने जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ मंदिराशी संबंधित 35 हजार एकर जमीन विकण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. आयोगाच्या शिफारसीनुसार, राज्य सरकारच्या Approved Policy नुसार जमीन विकण्यासाठी पावले उचलली जात आहेत. वाचा सविस्तर

हॉलीवूडमधील प्रख्यात जोडपं म्हणून एकेकाळी ब्रॅड पिट आणि एंजेलिना जोलीचे उदाहरण सांगितले जायचं. पण आता एंजेलिना जोलीनं ब्रॅ़ड पिटवर मारहाणीचा आरोप केला आहे. तो मला मारहाण करायचा असे एंजेलिनानं म्हटलं आहे. आता त्या दोघांचा घटस्फोट झाला आहे. वाचा सविस्तर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT