afternoon news
afternoon news 
देश

राज्याचा निर्णय आज संध्याकाळी ते पुण्यावर मोदी सरकारची अवकृपा...वाच एका क्लीकवर

सकाळ डिजिटल टीम

कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता प्रशासनाने जे निर्बंध घातलेले आहेत, त्याची अंमलबजावणी कठोरपणे करण्याबाबत अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना सूचना दिल्याचे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले....तसेच 2021 पश्चिम बंगालमध्ये आज चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. याचदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिलीगुडी येथील एका प्रचारसभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला आहे.

  1. राज्याच्या निर्णय आज संध्याकाळी कळेल; अजित पवारांची माहिती

    बारामती : कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता प्रशासनाने जे निर्बंध घातलेले आहेत, त्याची अंमलबजावणी कठोरपणे करण्याबाबत अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना सूचना दिल्याचे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे आज अजित पवार यांनी कोरोना संदर्भात वरिष्ठ अधिका-यांशी सल्लामसलत केली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली....वाचा सविस्तर
     
  2. दहशतवाद्यांना न घाबरणाऱ्या जवानांना दीदींचे गुंड काय घाबरवतील? PM मोदींचा हल्लाबोल

    कोलकाता- West Bengal Assembly Election 2021 पश्चिम बंगालमध्ये आज चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. याचदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिलीगुडी येथील एका प्रचारसभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला आहे....वाचा सविस्तर
     
  3. कूचबिहारमध्ये 4 जणांच्या मृत्यूनंतर निवडणूक आयोगाने मतदान थांबवलं

    कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान आज (दि.10) सकाळी सात वाजता सुरु झाले. या टप्प्यात 5 जिल्ह्यातील 44 जागांवरील उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मतदान केंद्रांवर सकाळापासूनच मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले....वाचा सविस्तर
     
  4. मग मोठ्या लॉकडाउनची गरज नाही; मुंबईच्या पालकमंत्र्यांचे सूचक विधान

    मुंबई : राज्यात सध्या कोरोनाची लाट आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित आढळत आहेत. कोरोनाची साखळ तोडण्यासाठी दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी आणि वीकेंडला लॉकडाउन असा पॅटर्न महाराष्ट्रात सुरू आहे. मात्र नागरिकांकडून अद्यापही नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे बोललं जातंय...वाचा सविस्तर
     
  5. पुण्यावर मोदी सरकारची अवकृपा; लशीचे डोस दिलेच नाहीत!

    पुणे - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लशीचा अपुरा साठा यामुळे लसीकरण मोहिमेचा वेग थंडावला आहे. काही ठिकाणी लसीकरण केंद्र बंदही करण्यात आली आहेत. यामुळे नागरिकांना लसीकरण केंद्रावरून परत जावं लागत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून पुणे हॉटस्पॉट आहे....वाचा सविस्तर
     
  6. पिंपरीत 4 हजार 800चं रेमडेसिव्हीर 11 हजारांना; चौघांना अटक

    पिंपरी : रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या चौघांना पिंपरी-चिंचवड येथे अटक करण्यात आली आहे. सांगवी परिसरातून चौघांना अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून तीन रेमडेसिव्हीर इंजेक्शनसह चार मोबाईल, एक स्कूटर असा एक लाख 74 हजार रुपयांची मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे...वाचा सविस्तर
     
  7. सलून दुकानांत चिकन अन् कापड दुकानांत भाजीपाला!

    वाळूज (औरंगाबाद): लॉकडाउनमुळे शासनाने दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले. हे आदेश देताना अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. याच नियमाचा आधार घेत वाळूज येथील सर्वच व्यापारी आपापल्या दुकानातून अत्यावश्यक सेवा देणार आहेत...वाचा सविस्तर
     
  8. शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या, 'या' आहेत अटी अन् पात्रता

    नागपूर : जिल्हा परिषद शिक्षकांच्या ३१ मे पर्यंत ऑनलाइन पद्धतीने बदल्या करण्याबाबतचे ग्रामविकास विभागाने आदेश काढले. शिक्षकांच्या बदलीबाबत यापूर्वीचा आदेश वादग्रस्त ठरला होता. त्यामुळे या शासन निर्णयात बदल करण्याची मागणी शिक्षक संघटना कडून सातत्याने करण्यात आली होती...वाचा सविस्तर
     
  9. कोरोनावर मात केल्यानंतर प्रिया बापटचा खास मेसेज

    मुंबई- मराठी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल प्रिया बापट आणि उमेश कामतला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या चाहत्यांनी तेव्हा सोशल मिडीयावर त्यांच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त केली होती. प्रिया आणि उमेशने एक खास लाईव्ह सेशन घेतले होते, त्यामध्ये त्यांनी सांगितले होते की त्या दोघांनी ही कोरोनावर मात केली आहे....वाचा सविस्तर
     
  10. अँकर हिंदी बोलू लागल्यावर ए. आर. रहमान चिडले; आता दिलं स्पष्टीकरण

    ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान यांच्या प्रॉडक्शन हाऊसचा '९९ साँग्स' हा चित्रपट येत्या १६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या म्युझिक लाँचचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात रहमान यांच्या स्वभावाचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला....वाचा सविस्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SCROLL FOR NEXT