Oommen Chandy Passes Away
Oommen Chandy Passes Away esakal
देश

Oommen Chandy Passes Away : मुलाने नावाने हाक मारली आणि मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबला

सकाळ डिजिटल टीम

Oommen Chandy Passes Away : केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमेन चंडी यांनी वयाच्या 79 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर बेंगळुरू येथील चिन्मय मिशन रुग्णालयात उपचार सुरू होते. माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी हे प्रशासक, नेता म्हणून तर लोकांना आवडायचेच पण त्याव्यतिरिक्त एक व्यक्ती म्हणून देखील लोक त्यांचा आदर करायचे. जे कोणी त्यांच्याकडे जायचे कधीच रिकाम्या हाताने परतायचे नाहीत.

असाच एक रंजक किस्सा म्हणजे ते मुख्यमंत्री असताना एका शाळकरी मुलाने त्यांना त्यांच्या नावाने हाक मारली तेव्हा मुलाच्या हाकेवर त्यांनी जी प्रतिक्रिया दिली होती हे केरळमध्ये आजही उदाहरणादाखल दिलं जातं.

ओमेन चंडी हे दोन वेळा केरळचे मुख्यमंत्री होते, राज्याच्या राजकारणात त्यांचा दर्जा इतका मोठा होता की गेल्या 50 वर्षांपासून ते एकाच जागेवरून सतत विजयी होत होते. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षापासून ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत अनेक पदांवर काम केले. ते विरोधी पक्षाचे नेते देखील होते. त्यांनी पहिल्यांदा 1970 मध्ये पुथुपल्ली मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती.

तो किस्सा काय होता

हा किस्सा त्या काळातील आहे जेव्हा ओमन चंडी 2011 ते 2016 दरम्यान मुख्यमंत्री होते. दरम्यान, उत्तर केरळमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या शाळेच्या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी ते पोहोचले होते. इकडे शाळेच्या इमारतीचे उद्घाटन करून ते परत कारकडे जात असताना एका मुलाने त्यांना त्यांच्या नावाने हाक मारली. आवाज कानावर येताच चंडी थांबले आणि मागे वळले. हा आवाज एका मुलाने दिल्याचे त्यांना समजल्यावर ते अवाक झाले.

सीएम चंडी यांना नक्कीच धक्का बसला असेल, पण आवाज मुलाने दिल्याचे पाहून ते आधी हसले आणि नंतर त्यांच्या दिशेने गेले. मुलाच्या धाडसाचे कौतुक केले आणि विचारले, सांग काय काम आहे? मुलाने न घाबरता उत्तर दिले की त्याच्या वर्गमित्राला घर नाही. त्यालाही घर हवे आहे. तत्कालीन सीएम चंडी यांनी तातडीने कारवाई करत अधिकाऱ्यांना घटनास्थळी सर्व माहिती गोळा करण्यास पाठवले. कुटुंब पात्र ठरल्यानंतर आणि घर वाटप झाल्यानंतर सीएम चंडी यांनी मुलाच्या वर्गमित्राचे नाव सरकारी योजनेत समाविष्ट केले.

राजकीय जीवन

ओमेन चांडी यांचा जन्म 1943 मध्ये कोट्टायम जिल्ह्यातील पुथुपल्ली भागात झाला. ग्रॅज्युएशनच्या काळात ते केरळ स्टुडंट्स युनियन म्हणजेच KSU मध्ये सामील झाले होते. 1967 मध्ये त्यांना अध्यक्ष करण्यात आले. 1970 मध्ये त्यांची युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यावेळी त्यांचे वय 26 वर्षे होते. त्याच वर्षी त्यांनी पुथपल्ली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले.

1977 मध्ये पहिल्यांदा मंत्री झाले

ओमेन चंडी यांना 1977 मध्ये केरळ सरकारमध्ये कामगार मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. ते 1978 मध्ये ए के अँटनी सरकारमध्ये मंत्रीही होते. नंतर त्यांनी करुणाकरन सरकारमध्येही कॅबिनेट मंत्रिपद स्वीकारले. 1991 मध्ये करुणाकरन सरकारमध्ये त्यांना अर्थमंत्री बनवण्यात आले होते, परंतु गटबाजीमुळे त्यांनी 22 जून 1994 रोजी एका नेत्याला तिकीट न मिळाल्याच्या निषेधार्थ मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

2004 मध्ये मुख्यमंत्री झाले, घोटाळ्यातही नाव आले

2004 मध्ये ओमेन चंडी पहिल्यांदा केरळचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. 2006 पर्यंत ते मुख्यमंत्री राहिले. सरकारमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारली आणि 2011 मध्ये मुख्यमंत्री म्हणून पुन्हा सत्तेत आले आणि 2016 पर्यंत ते मुख्यमंत्री राहिले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांचे नाव दोनदा घोटाळ्यांमध्येही आले.

संयुक्त राष्ट्राकडून पुरस्कार मिळवणारे एकमेव माजी मुख्यमंत्री

ओमेन चंडी हे एकमेव मुख्यमंत्री आहेत ज्यांना संयुक्त राष्ट्राने सार्वजनिक सेवेसाठी पुरस्कार दिला आहे. केरळ विधानसभेत सर्वाधिक काळ सलग आमदार राहण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. ऑगस्ट 2022 मध्ये त्यांच्या नावावर हा विक्रम झाला, तोपर्यंत ते 18728 दिवस सतत सभागृहाचा भाग होते. 2006 मध्ये स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या 35व्या जागतिक आर्थिक कार्यक्रमातही त्यांनी भाग घेतला होता.

माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी 1977 मध्ये मरियम्माशी लग्न केले, त्यांना तीन मुले आहेत. मुलाचे नाव चंडी ओमेन आहे, तर मुलींची नावे मारिया आणि अचू आहेत. त्यांच्या भावाचे नाव अॅलेक्स व्ही चंडी आहे. एका मुलाखतीत मरियम्माने सांगितले होते की, लग्न ठरल्यानंतर ओमेन चंडी यांनी त्यांना लिहिलेले पहिले पत्र फक्त दोन ओळींचे होते 'निवडणुकीची वेळ आली आहे, मला तुमच्या प्रार्थनेची गरज आहे.'

आदिवासी वसाहतीला ओमेन चंडी यांचे नाव

इडुक्की जिल्ह्यातील कांजीकुझी भागातील एका संपूर्ण कॉलनीला माजी सीएम ओमेन चंडी यांचे नाव देण्यात आले आहे, विशेष म्हणजे या कॉलनीचे नाव 1974 मध्ये ते राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना ठेवण्यात आले होते. आदिवासी समुदायाचे नेते सुकुमारन कुन्नुमपुरथ यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, माजी मुख्यमंत्री चंडी यांच्या नावावर कॉलनीचे नाव देणे हा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT